Shreya Maskar
झोपेत असताना अचानक उचकी लागणे किंवा उचकीमुळे झोपमोड होणे हा त्रास अनेकांना जाणवतो. वारंवार रात्री उचकी लागत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये.
उचकी म्हणजे डायाफ्राम (श्वास घेण्यास मदत करणारा छाती आणि पोट यांच्यामधील स्नायूंचा पडदा) अचानक आकुंचन पावणे. त्यानंतर स्वरयंत्रातील जागा क्षणभर बंद होते आणि 'हिक' असा आवाज निर्माण होतो.
पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येत असल्यास डायाफ्राम आणि संबंधित नसांना त्रास होऊ शकतो. यामुळे उचकी लागू शकते. रात्री जेवल्यानंतर लगेच झोपल्यास हा त्रास वाढू शकतो.
जास्त जेवण, घाईघाईने खाणे किंवा कार्बोनेटेड पेये प्यायल्यामुळे पोटात हवा जमा होऊ शकते. त्यामुळे डायाफ्रामवर दाब येऊन उचकी लागू शकते.
रात्री उशिरा किंवा गरजेपेक्षा जास्त जेवल्यामुळे पोट फुगते. यामुळे उचकी येण्याची शक्यता वाढते. मद्यपान, अतिथंड पेये किंवा अचानक तापमान बदलल्याने काही व्यक्तींना उचकी लागू शकते.
झोपेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये श्वसन आणि स्नायूंच्या हालचालींमध्ये बदल होतात. काही वेळा यासोबत उचकी येऊ शकते.
गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज (GERD), मेंदू आणि मज्जासंस्थेचे विकार, पोटाचा दाह , फुफ्फुसांचे आजार, किडनीचे आजार आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.