Morning Hand Stiffness : सकाळी उठल्यावर बोटं आखडतात? असू शकतात 'या' गंभीर आजाराचे सुरुवातीचे संकेत

Shreya Maskar

झोपेतून उठल्यानंतर हाताची बोटे आखडणे

सकाळी झोपेतून उठल्यानंतर हाताची बोटे आखडल्यासारखी वाटणे, मुठ आवळताना त्रास होणे, हात जड पडणे किंवा बोटे हलवताना कडकपणा जाणवणे, अशी लक्षणे अनेकांना जाणवतात.

morning hand stiffness | pinterest

वेदना-सूज जाणवते

काही वेळा थोडी हालचाल केल्यानंतर हा त्रास कमी होतो. मात्र हा त्रास वारंवार होत असेल, तसेच वेदना व सूज येत असेल तर त्यामागे इतर अनेक कारणे असू शकतात.

Pain-swelling is felt | pinterest

संधिवात

सकाळी उठल्यानंतर हाताची बोटे आणि मनगट आखडल्यासारखे वाटण्यामागे संधिवात असू शकतो. सकाळी बोटे हलवताना कडकपणा जाणवतो. हाताच्या सांध्यांमध्ये वेदना किंवा सूज येऊ शकते.

Arthritis | pinterest

रुमेटॉइड आर्थराइटिस

रुमेटॉइड आर्थराइटिस हा शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेशी संबंधित आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून सांध्यांवर परिणाम करते. दोन्ही हातांच्या बोटांच्या सांध्यांमध्ये वेदना जाणवतात. हाताने वस्तू पकडताना किंवा मुठ आवळताना त्रास होतो.

Rheumatoid arthritis | pinterest

कार्पल टनेल सिंड्रोम

मनगटातून जाणाऱ्या मध्यवर्ती मज्जातंतूवर दाब आल्यामुळे हा त्रास होतो. झोपताना मनगट वाकलेल्या स्थितीत राहिल्यास काही लोकांमध्ये लक्षणे वाढू शकतात. सकाळी हात सुन्न पडल्यासारखा वाटते. अंगठा, मधल्या बोटात मुंग्या येतात. हातात जळजळ किंवा वेदना होतात.

Carpal tunnel syndrome | pinterest

हाताच्या स्नायूंवर ताण

दिवसभर मोबाईल वापरणे, संगणकावर काम करणे, सतत टायपिंग करणे किंवा हाताने वारंवार एकच काम करणे यामुळे स्नायू आणि सांध्यांवर ताण येऊ शकतो. यामुळे सकाळी हात कडक वाटणे, बोटे हलवताना वेदना जाणवतात.

Arm muscle tension | pinterest

झोपण्याची चुकीची स्थिती

झोपताना हाताखाली डोके ठेवणे, हात शरीराखाली दाबला जाणे किंवा मनगट जास्त वाकलेल्या स्थितीत राहणे यामुळे नसांवर किंवा रक्तवाहिन्यांवर तात्पुरता दाब येऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर हात जड होतात.

Incorrect sleeping position | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT :  स्मोकिंगपेक्षाही धोकादायक ठरू शकतं एकटेपण, 'या' ७ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Loneliness | AI PHOTO
येथे क्लिक करा...