Maharashtra Politics: 'शिंदेसाहेब, तुमचं संपर्कप्रमुखपद तुमच्याकडेच ठेवा', शिवसेना नेत्याने राजीनामा देत उपमुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल

Deputy CM Eknath Shinde: अहिल्यानगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाजीराव दराडे यांनी उपमुख्यमंत्र्यांनाच खडेबोल सुनावले आहेत.
Maharashtra Politics: 'शिंदेसाहेब, तुमचं संपर्कप्रमुखपद तुमच्याकडेच ठेवा', शिवसेना नेत्याने राजीनामा देत उपमुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल
Deputy CM Eknath ShindeSaam Tv
Published On

Summary -

  • बाजीराव दराडे यांनी शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला.

  • मारुती मेंगाळ यांच्या प्रवेशावरून वाद निर्माण झाला.

  • शिंदे गटात जुने-नवे नेते यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष वाढू शकतो.

  • या घटनेमुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

'शिंदेसाहेब आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर तुमच्या पक्षाचे संपर्कप्रमुख पद तुमच्याकडेच ठेवा.' असे खडेबोल शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाजीराव दराडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहेत. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी ४ महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्यादरम्यान विश्वासात न घेतल्याने पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे नाराज होते. त्यातच मेंगाळ यांनी पक्ष प्रवेशाची बोगस यादी सादर करून पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप बाजीराव दराडे यांनी केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दराडे आणि मेंगाळ यांच्यातील पक्षांतर्गत वाद शिगेला पोहचला होता.

Maharashtra Politics: 'शिंदेसाहेब, तुमचं संपर्कप्रमुखपद तुमच्याकडेच ठेवा', शिवसेना नेत्याने राजीनामा देत उपमुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल
Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

९ ऑगस्ट रोजी मारुती मेंगाळ यांनी अकोले येथे आयोजित केलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मारुती मेंगाळ यांनी 'एकतर दराडे यांना पक्षात ठेवा किंवा आम्हाला तरी ठेवा', अशी मागणी भर मंचावर एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. 'कार्यकर्त्यांना कुणापासूनही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहे. शिवसेना पक्ष मालक आणि नोकराचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. जो पक्षासाठी काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्यांना खोडा घालेल त्याला व्यवस्थित बाजूला केले जाईल.' असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी बाजीराव दराडे यांना पक्षातून बाजूला करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.

Maharashtra Politics: 'शिंदेसाहेब, तुमचं संपर्कप्रमुखपद तुमच्याकडेच ठेवा', शिवसेना नेत्याने राजीनामा देत उपमुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल
Maharashtra Politics : काँग्रेसचा गड ढासळला! सांगलीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर बाजीराव दराडे यांनी २४ तासांच्या आत स्वतःहून आपला राजीनामा वरिष्ठांकडे पाठवला आहे. 'शिंदेसाहेब, आम्ही जन्म दिलेल्या लोकांना तुम्ही आमच्याच डोक्यावर बसवत असाल तर पक्षाचे संपर्क प्रमुख पद तुमच्याकडेच ठेवा. मी पक्षात एकनाथ शिंदे म्हणून नाही तर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी म्हणून काम केले. माझ्याच तालुक्यात येऊन पक्षाचे नेते माझी शक्ती हीन करणार असतील तर पक्षात राहायचे कशाला?. मी पक्ष म्हणून उदयास आलो नाही तर संघर्षातून पुढे आलो आहे.', अशा शब्दांत बाजीराव दराडे यांनी एकनाथ शिंदे यांनाच खडेबोल सुनावले आहेत. सत्तेत असल्याने शिवसेना शिंदेगटात आजतागायत अनेक पक्षप्रवेश झालेत आणि होत आहेत. मात्र आता अनेक ठिकाणी जुने आणि नवे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याने आगामी काळात शिंदे सेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता दिसत आहे.

Maharashtra Politics: 'शिंदेसाहेब, तुमचं संपर्कप्रमुखपद तुमच्याकडेच ठेवा', शिवसेना नेत्याने राजीनामा देत उपमुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल
Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांची ताकद वाढणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com