Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांची ताकद वाढणार

Nandurbar Politics: नंदुरबारमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी उपमख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांची ताकद वाढणार
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • नंदुरबारमध्ये माजी मंत्री पद्माकर वळवी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार.

  • काँग्रेस आणि भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता.

  • पद्माकर वळवी हे आदिवासी आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात.

  • आगामी निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या हालचालींना वेग.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच राज्यातील राजकीय समिकरणं बदलताना दिसत आहेत. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंक आणि आऊटगोईंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील पक्ष महाविकास आघाडीतील पक्षांना एकापाठोपाठ धक्का देत आहेत. अशामध्ये आता नंदूरबार जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. पद्माकर वळवी हे आधी काँग्रेसमध्ये आणि नंतर भाजपमध्ये होते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आदिवासी आक्रमक चेहरा म्हणून पद्माकर वळवी यांची ओळख आहे. त्यांनी जर अजित पवार गटात प्रवेश केला तर हा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढेल. यामुळे भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसेल.

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांची ताकद वाढणार
Maharashtra Politics: नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

काँग्रेस सरकारमध्ये तत्काली क्रीडा मंत्री असलेल्या पद्माकर वळवी यांनी लोकसभेपूर्वी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला होता. मात्र उमेदवारी न मिळाल्याने विधानसभेत त्यांनी भाजपला रामराम करत आदिवासी पार्टीत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागता होता. त्यानंतर आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांची ताकद वाढणार
Maharashtra Politics: मनसे-शिवसेनेची टाळी वाजली; पण राज ठाकरेंसाठी आघाडीची दारे अजून बदंच!

नुकताच पद्माकर वळवी यांनी मुंबई जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांची भेट घेतल्याचे त्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. येत्या निवडणुकीपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात पक्ष प्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. माजी मंत्री पद्माकर वळवी हे राष्ट्रवादीत अधिकृतरित्या प्रवेश करतील का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांची ताकद वाढणार
Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com