
उजनी धरण १०० टक्के भरल्याने पाण्याची चिंता मिटली..
सोलापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांना वर्षभर पुरेसा पाणीपुरवठा
शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण.
मुसळधार पावसामुळे धरणाच्यापाणी पातळीत मोठी वाढ.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील अनेक धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर काही धरणं ९० टक्क्यांच्या आसपास भरली आहेत. त्यामुळे राज्यांतील नागरिकांचे पाण्याचे टेन्शन मिटलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणं १०० टक्के भरले आहे. त्यामुळे सोलापुरसह अहिल्यानगर आणि पुणेकरांचे पाण्याचे टेन्शन मिटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्याची वरदायणी असलेले उजनी धरण १०० टक्के भरले. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उजणी धरण भरल्यामुळे सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणामध्ये एकूण ११७ टीएमसी इतका पाणी साठा झाला असून धरण १०० टक्के भरले आहे.
यंदा मे आणि जून महिन्यामध्ये उजनी धरण वजा पाणी पातळीतून प्लसमध्ये आले होते. जुलैमध्ये पुणे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. ऑगष्टच्या सुरवातीपासून धरणातून पाणी सोडणे बंद केले आहे. त्यामुळे शनिवारी रात्री धरण १०० टक्के भरले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा वर्षभर मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत.
दरम्यान, पुण्यातील खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर कमी झाला. १ ते ९ ऑगस्ट दरम्यान पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली. महिन्याच्या पहिल्या ४ दिवस पावसाची चांगली नोंद झाली होती. मात्र ५ ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली. त्यामुळे या ८ दिवसांत खडकवासला येथे ५ मिलीमीटर, पानशेत येथे १५ मिलीमीटर, वरसगाव येथे १० मिलीमीटर, तर टेमघर येथे ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
सध्या खडकवासला धरण ५८.१६ टक्के भरले आहे. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालवा मार्गे ७५० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. तर पुण्यातील इतरही धरणं चांगली भरली आहेत. पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतून आज पाण्याचा विसर्ग करण्यात येणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.