
लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरु
छत्रपती संभाजीनगरमधील १ लाख ४ हजार महिलांचे अर्ज बाद
अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन केली छाननी
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु केली आहे. यातील अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची पडताळणी करत आहेत. त्या प्रत्येक निकषांमध्ये बसत आहेत की नाही याची माहिती घेत आहे. दरम्यान, आता छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास १ लाख ४ हजार महिला निकषात न बसल्याचे दिसत आहेत. त्यांचे अर्ज आता बाद केले आहेत.
१ लाख ४ हजार महिलांचे अर्ज बाद
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २० हजार लाडक्या बहिणी वयाच्या निकषात बसत नसलेल्या आढळून आल्या आहेत. १ लाख ४ हजार अर्जाची पडताळणी सुरू केल्यानंतर ८४ हजार अर्ज हे एकाच घरातील ३ महिलांचे असल्याचं दिसून आलंय.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील सुमारे २६ लाख संशयित लाभार्थीच्या गृह चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ४ हजार अर्जाची फिजिकल पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ८४ हजार अर्ज हे एकाच घरातील तीन किंवा अधिक महिलांचे असल्याचे तपासणीत समोर आली आहे, तर २० हजार अर्ज २१ वर्षांखालील किंवा ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लाभार्थीचे आहेत.
अपात्र महिलांचा लाभ बंद
या सर्व अर्जदारांचा लाभ शासनाकडून थांबवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात १०,१५,८३४ अर्ज आले होते. त्यापैकी ९,२४, ३४८ अर्ज मंजूर झाले. पात्र-अपात्र ठरवण्यासाठी अंगणवाडी सेविका वयोमर्यादा, कागदपत्रांची सत्यता, निर्गम उतारा, टीसी आदींची तपासणी करण्यात येणार आहे. एका घरात तीन अर्जदार असल्यास, फक्त दोन महिलांना पात्र ठरवून तिसरीला अपात्र घोषित केले जाईल.
गेल्या तीन महिन्यांत ४३५ महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ न घेण्याचे अर्ज सादर केले आहेत. हे अर्ज शासनाच्या पोर्टलवर अपलोड केले आहेत. अंतिम निर्णय शासन स्तरावर होईल. पडताळणीत एकाच घरातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी आढळल्यास, कोणत्या दोन महिलांना लाभ द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार कुटुंबप्रमुखाला देण्यात येणार आहे. यामुळे काही कुटुंबांत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.