Nagpur Beer Bar Turns Into Office
Nagpur Beer Bar Turns Into Office

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Nagpur Beer Bar Turns Into Office: वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याची उपराजधानी चर्चेत असताना सरकारी कारभारही कशा पद्धतीने चालतोय त्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. एका बियर बारमध्ये चक्क दारुचे घोट रिचवत शासकीय फाईलवर सह्या केल्या जात होत्या. पाहूया एक खास रिपोर्ट.
Published on
Summary
  • नागपूरमध्ये बिअर बारमध्ये सरकारी अधिकारी फाईलींवर सह्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल.

  • रविवारी सुट्टीच्या दिवशी बारमध्येच चालू होता शासकीय कारभार.

  • काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

  • गृहराज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे जाहीर केले आहे.

वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याची उपराजधानी चर्चेत असताना सरकारी कारभारही कशा पद्धतीने चालतोय त्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. एका बियर बारमध्ये चक्क दारुचे घोट रिचवत शासकीय फाईलवर सह्या केल्या जात होत्या. पाहूया एक खास रिपोर्ट.

हे कुठलं सरकारी कार्यालय नाही. तर हा आहे नागपूर शहरातला वर्दळीच्या ठिकाणचा एक बिअर बार. हा व्हीडीओ नीट पाहा... इथे तीनजण सरकारी फाईलींचा गठ्ठा घेऊन बसलेले दिसतायत. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील एक जण फाईलींवर भराभर सह्या करत होता. जवळपास तासभर या फाईलींवरुन तिघांमध्ये चर्चा सुरु होती. दुपारच्या सुमारास कार्यालयाएेवजी एका बारमध्ये बसून मस्त दारुचे घोट रिचवत गतीमान शासकीय कारभार केला जात होता. तोही अगदी रविवारी सुट्टीच्या दिवशी.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. तर या प्रकाराची चौकशी करु असं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलंय.

शासन 'बार'च्या दारी या प्रकाराची प्रशासनाकडून चौकशी सुरु असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं. शासनाच्या कारभाराचे धिंडवडे काढणाऱ्या या घटनेवर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत.

साम टीव्हीचे सवाल

बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन येणारे 'ते' अधिकारी-कर्मचारी कोण?

अधिकारी कोणत्या विभागाचे होते?

कोणत्या विषयांच्या फाईल्स बियर बारमध्ये आणल्या?

रविवारी सुट्टीच्या दिवशी फाईल्स कार्यालयाबाहेर आल्याच कशा?

सरकारी काम आणि सहा महिने थांब असं उपहासाने म्हटलं जातं. सामान्य जनतेची अनेक कामे वर्षानूवर्षे रखडलेली आहेत. 'शासन आपल्या दारी' असा उपक्रम राबवला जात असताना सरकार आता थेट 'बार'च्या दारी आल्यानं संतापाचा सूर आहे. सीसीटीव्हीची तपासणी करुन संबंधित अधिकारी-कर्मचा-यांवर कडक कारवाईची मागणी होतेय.

(सरकारी कामकाजाचे धिंडवडे काढणाऱ्या या घटनेनं सामान्यांमध्ये संताप आहे. शासनाच्या प्रतिमेलाही यातून तडा जात आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वत:हून संबंधित बिअरबारमध्ये जाऊन तपास करणे गरजेचे आहे. सुट्टीच्या दिवशी बार गाठून फाईल क्लिअर करणा-या अधिका-यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com