Ladki Bahin Yojana AI Image
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पडताळणी सुरु; अंगणवाडी सेविका घरी येऊन करणार चौकशी; कशी असणार प्रक्रिया?

Ladki Bahin Yojana Verification Process: लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी कशी होणार ते जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे.या योजनेत आता अपात्र महिलांचे अर्ज बाद होणार आहे. राज्यातील जवळपास ३० लाख महिला अपात्र असल्याचे सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नियमांत न बसूनही लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळणार नाही. अनेक महिलांनी अर्जदेखील माघारी घेतले आहेत.

लाडकी बहीण योजनेत अर्जांची पडताळणी कशी होणार?

महिला व बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरु केली आहे. महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे की नाही हे पाहण्यासाठी अंगणवाडी सेविका स्वतः घरोघरी जाणार आहेत. यासाठी महिला व बालविकास विभागाने परिवहन खात्याची मदत घेतली आहे. ज्या महिलांकडे किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन आहे त्यांची यादी काढली जाणार आहे. त्यानंतर घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.

याचसोबत ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची तपासणी आयकर विभागाच्या मदतीने केली जाणार आहे. आयकर विभागाकडून महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर चौकशी करणार आहे.

लाडकी बहीण योजनेत पुण्यातील तब्बल ७५ हजार महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना योजनेतून वगळले जाणार असल्याचे सांगितले आहे. या योजनेत अपात्र महिलांना १५०० रुपये मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT