Top Headlines @4 PM : मुंडेंनी दमानियांचे आरोप फेटाळले, लाडक्या बहिणींकडे चारचाकी असल्यास अपात्र ठरणार.. वाचा टॉप हेडलाइन्स

Top Headline News : मुंडे कृषीमंत्री असताना २७५ कोटींचा घोटाळा, अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप, धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, जरांगे पाटलांची मागणी.. इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

- धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना २७५ कोटींचा घोटाळा,अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप. तर सनसनाटी निर्माण करण्यासाठी दमानियांचे आरोप खोटे, मुंडेंनी आरोप फेटाळले.

- धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, जरांगे पाटलांची मागणी. सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी.

- शिववरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावरुन अभिनेते राहुल सोलापूरकरांविरोधात संताप, इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा कोण? आव्हाडांचा सवाल तर टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं, मिटकरीचा हल्लाबोल.

- कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्यांची शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात पुरली, खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा.

- लाडक्या बहिणींकडे चारचाकी असल्यास अपात्र ठरणार, अंगणवाडी सेविका करणार पडताळणी.

- मुंबई महापालिकेचा ७४ हजार ४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर, तुर्तास कोणतीही करवाढ नाही. कचरा संकलन कराबाबत कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com