Kangana Ranaut : कंगना रनौत होणार शिक्षणमंत्री? शिक्षणमंत्री बनवण्यासाठी मोदींना साकडं? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Kangana Ranaut Political News : सोशल मीडियावर कंगना राणावत यांनी नरेंद्र मोदींकडे भारताच्या शिक्षणमंत्रीपदाची मागणी केल्याचा दावा व्हायरल होत आहे. मात्र, पडताळणीत हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले. जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचे सत्य.
FACT CHECK: DID KANGANA RANAUT ASK PM MODI TO MAKE HER INDIA'S EDUCATION MINISTER? VIRAL POST IS FAKE
FACT CHECK: DID KANGANA RANAUT ASK PM MODI TO MAKE HER INDIA'S EDUCATION MINISTER? VIRAL POST IS FAKESaam tv
Published On
Summary
  • कंगना राणावत यांची पोस्ट व्हायरल

  • व्हायरल पोस्टमध्ये शिक्षणमंत्री होण्याची मागणी

  • व्हायरल पोस्ट बनावट

  • पडताळणीत हा दावा बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानावरून चर्चेत असलेल्या भाजप खासदार कंगना आता शिक्षणमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. कंगनाने मोदींकडेच शिक्षणमंत्री होण्याची इच्छा दर्शवली असल्याचा दावा केलाय. तिच्या नावाची एक पोस्ट व्हायरल होतेय. पण, खरंच कंगनाने मोदींना विनंती केलीय का?

या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, मी नरेंद्र मोदींना विनंती करते की, त्यांनी मला भारताची शिक्षणमंत्री म्हणून नियुक्त करावे. मला शिक्षणाचे महत्त्व समजते, कारण भारताला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले हे सत्य लोकांना दाखवणारी मी पहिली व्यक्ती होते. माझ्याकडे नीटसाठीही एक योजना आहे.

FACT CHECK: DID KANGANA RANAUT ASK PM MODI TO MAKE HER INDIA'S EDUCATION MINISTER? VIRAL POST IS FAKE
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

तसंच आणखी या मेसेजमध्ये लिहिण्यात आलंय. जो कोणी विद्यार्थी माझा चित्रपट थिएटरमध्ये पाहिल त्याला नीटमध्ये अतिरिक्त गुण मिळतील. यामुळे माझ्या फ्लॉप चित्रपटांची मालिका संपेल आणि हा सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल.अशी पोस्ट आता व्हायरल होतेय.पण, खरंच कंगनाने मोदींकडे शिक्षणमंत्री होण्याची इच्छा दर्शवलीय का? तिने ही पोस्ट केलीय का? याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही कंगनाचे सोशल मीडिया हॅन्डल्स तपासून पाहिले.मात्र, आम्हाला अशी पोस्ट कुठेही सापडली नाही. मग ही पोस्ट नक्की कुठून आली?

जेनझींना गटारछाप म्हटल्यावरून कंगना चर्चेत. तिच्यावर टीकाही झाली. त्यामुळे कंगनाच्या नावाने असे मेसेज व्हायरल केले जातायत. चुकीचे मेसेज व्हायरल करून सोशल मीडियावरून दिशाभूल केली जातेय. मात्र, कंगनाने अशी कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे आमच्या पडताळणीत कंगना शिक्षणमंत्री होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

FACT CHECK: DID KANGANA RANAUT ASK PM MODI TO MAKE HER INDIA'S EDUCATION MINISTER? VIRAL POST IS FAKE
Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com