Lockup 2 Winner : 'लॉक अप २' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? जिंकले तब्बल 'इतक्या' कोटींचे बक्षीस

Lockup 2 Grand Finale : रितेश देशमुख होस्ट करत असलेल्या 'लॉक अप २' या शोचा नुकताच थाटामाटात ग्रँड फिनाले पार पडला आहे. कोणी बाजी मारली, जाणून घेऊयात.
Lockup 2 Grand Finale
Lockup 2 WinnerSAAM TV
Published On
Summary

'लॉक अप २' चा ग्रँड फिनाले पार पडला.

रितेश देशमुख, फराह खान यांनी 'लॉक अप २' चे होस्टिंग केले.

'लॉक अप २' हा लोकप्रिय रिॲलिटी शो आहे.

लोकप्रिय रिॲलिटी शो 'लॉक अप २' चा काल (५ ऑगस्ट) ला ग्रँड फिनाले पार पडला. या शोची सोशल मीडियावर तुफान क्रेझ पाहायला मिळाली. यंदा 'लॉक अप २'चे होस्टिंग रितेश देशमुख आणि फराह खान यांनी केले. शोमध्ये रोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळाला.

'लॉक अप २' ची विजेता सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर श्रेया कालरा ठरली आहे. तिने विजेतेपदाचा मान पटकावला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. श्रेया कालराला 'लॉक अप २' च्या चकचकीत ट्रॉफीसोबत तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहते आणि कलाकार मंडळी श्रेया कालरावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

'लॉक अप २' ची प्रथम उपविजेती टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी ठरली. शोच्या टॉप ५ फायनलिस्टची नावे पुढीलप्रमाणे - श्रेया कालरा, शिवांगी जोशी, शिल्पा शिंदे, योगेश रावत आणि राम कपूर होय. 2022 मध्ये झालेल्या 'लॉक अप'चा विजेता मुनव्वर फारूकी ठरला होता.

Lockup 2 Grand Finale
Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

श्रेया कालरा कोण?

श्रेया कालरा ही प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर , अभिनेत्री, मॉडेल आणि रिॲलिटी टीव्ही स्टार आहे. ती पहिल्यांदा TikTok वर प्रसिद्ध झाली त्यानंतर ॲपवर भारतात बंदी घातल्यानंतर, तिने Instagram आणि YouTube वर मजबूत फॉलोअर्स तयार करून एक नवीन ओळख बनवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com