Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे श्रेया बुगडे.
'फू बाई फू', 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून श्रेया घराघरात पोहचली आहे.
श्रेयाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अभिनयच नाही तर श्रेयाच्या सौंदर्याने देखील वेड लावलं आहे.
सोशल मीडियावर श्रेया तिचे फोटो शेअर करते. नुकतच श्रेयाने काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोशूटसाठी श्रेयाने हिरव्या रंगाची कॉटनची साडी परिधान केली आहे. या साडीमध्ये श्रेया खुपच सुंदर दिसत आहे.
या साडी लूकवर श्रेयाने कानातले , हातात बांगड्या घालून लूक पूर्ण केला आहे.
श्रेयाचा हा सिंपल लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून अनेक नेटकऱ्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.