Manasvi Choudhary
साडीची सुंदरता ही केवळ चांगल्या क्वालिटीच्या कापडावर किंवा नेसण्याच्या शैलीवर अवलंबून नसून तर ब्लाऊजच्या डिझाईनवर देखील अवलंबून असते.
यासाठी आजकाल महिला अनेक डिझाईनचे ब्लाऊज पॅटर्न निवडतात. साडीवर सुंदर दिसण्यासाठी तुम्ही ब्लाऊजचा पॅटर्न युनिक असला पाहिजे.
यासाठी केवळ ब्लाऊजचा पुढचा गळा डिझाईन केलेला असावा असं नाही तर तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला देखील डिझाईन करू शकता. फ्रंट आणि बॅक असे ब्लाऊजचे दोन्ही डिझाईन्स आज आपण या वेबस्टोरीतून पाहूया.
ब्लाऊजच्या मागच्या गळ्याला डीप व्ही नेक तुम्ही शिवू शकता. यालाच डीप व्ही बॅक असे म्हणतात. अत्यंत स्टायलिश पॅटर्न आहे.
ब्लाऊजच्या मागच्या बाजूला तु्म्ही दोरी स्टाईल करू शकता. यामध्ये ब्लाऊजची मध्य बाजू ही ओपन असते तेथे तुम्ही दोरी क्रॉसमध्ये लावू शकता. हा एक बोल्ड स्टाईल ब्लाऊज पॅटर्न असेल.
या ब्लाऊज पॅटर्नमध्ये दोरीऐवजी तुम्ही थोड्या जाड आकाराच्या पट्या लावू शकता. स्लीव्हलेस ब्लाऊज शोल्डर लूक देऊ शकता.
हटके स्टाईलमध्ये बॅक नेक ब्लाऊजसाठी महिला बो नेक शिवतात. बो नेक ब्लाऊज पॅटर्न कायमच ट्रेंडमध्ये असतो.