Ladki Bahin Yojana SaamTv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: जानेवारी महिन्यात लाडक्या बहि‍णींना १५०० मिळणार की २१००; जाणून घ्या सविस्तर

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्यात १५०० की २१०० रुपये मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.

Siddhi Hande

महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेत महिलांना आता लवकरच २१०० रुपये दिले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले आहे. तर आता जानेवारी महिन्याला महिलांना १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये याबाबत संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर २१०० रुपये दिले जातील, असं सांगितलं जात होतं. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच २१०० रुपये मिळतील, असं महिलांना वाटत होतं. मात्र, अजूनही या वाढीव निधीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.त्यामुळे डिसेंबर महिन्यात महिलांना १५०० रुपये देण्यात आले होते. (Ladki Bahin Yojana Update)

दरम्यान, आता महिलांना २१०० रुपये मिळणार का याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना जानेवारी महिन्यात १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये याकडे सर्वांचेच लक्ष आहे. महिलांना या महिन्यातदेखील १५०० रुपये मिळणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये हप्ता दिला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे महिलांना या महिन्यातदेखील १५०० रुपये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाव्यात. जर महिला पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकी सैन्यातील अधिकाऱ्याने रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट, कोणी वाचवला जीव? धक्कादायक अहवाल समोर

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्रातला तो खासदार कोण? अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Satish Shah Love Story: दोन वेळा नकार नंतर थेट लग्न; चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही अभिनेते सतीश शाह यांची लव्हस्टोरी

Avneet Kaur Photos: अवनीत कौरच्या हॉट अदा, फोटोंवरून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT