Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹२१०० कधी मिळणार? २ दिवसात राज्य सरकार करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana 2100 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. २ दिवसात याबाबत घोषणा होऊ शकते.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार का?

अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता

राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु होऊन आता दीड वर्ष झाले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. विधानसभेच्या निवडणूकीआधी ही घोषणा केली होती. त्याचवेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचीही घोषणा केली होती. दरम्यान, योजना सुरु होऊन आता दोन वर्ष होतील तरीही योजनेचा हप्ता वाढवलेला नाही.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार?

लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरुन २१०० करण्याची घोषणा आधीच केली होती. परंतु अजून याची अंबलबजावणी झालेली नाही. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होईल,असं वाटलं होतं. मात्र, त्यावेळी अशी कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तरी लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? (Ladki Bahin Yojana Women Will Get 2100 Rupees)

राज्य सरकार ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील. यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजुर केला जाईल. त्याचदरम्यान, २१०० रुपयांबाबत घोषणा होणार की नाही याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री करणार सादर (Maharashtra Budget Session 2026)

यंदाचा २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर आता अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्प ६ मार्चला सादर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगरपालिका निवडणुकीत अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची? बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला सवाल

Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

देशातील परिस्थिती किती गंभीर? सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं दिली अपडेट, पाकिस्तानला म्हटलं दलाल

Nepal: देशाला मिळणार नवे पंतप्रधान; राम नवमीच्या दिवशीच शहांचा शपथविधी

पुण्यात ड्रग्जच्या नशेसाठी फुलचंद पान, पानांआडून अमली पदार्थांची तस्करी

SCROLL FOR NEXT