Siddhi Hande
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹१५०० जमा केले जातात.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झाला आहे.
या योजनेत जवळपास ८४ लाख महिलांच्या खात्यात जानेवारीचे पैसे जमा होमार नाहीयेत. यामागे अनेक कारणे आहेत.
लाभार्थी महिलांना ईकेवायसी करणे अनिवार्य केले होते. तरीही अनेक महिलांनी केवायसी केले नाहीत.
ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये.
ज्या महिलांच्या केवायसीमध्ये चुका झाल्या आहेत. त्यांना त्या दुरुस्त करण्यास सांगितल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हप्ता तूर्तास थांबवण्यात आला आहे.
केवायसीमध्ये दुरुस्ती करत असलेल्या महिलांनाही सध्या तरी जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये.
केवायसीमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत.