Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींकडून ७५०० परत घेतले;अपात्र महिलेने नेमकी चूक काय केली?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. धुळ्यातील एका महिलेकडून ७५०० रुपये परत घेतले आहे. यामागचे कारण काय? जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे.जर निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे. तुम्हाला दिलेले पैसे परत सरकारजमा होऊ शकतात. कारण एका महिलेकडून 5 महिन्यांचे साडे सात हजार रुपये परत घेण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झालं. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगण्यात आले. (Ladki Bahin Yojana Update)

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरविलं जाणार आहे. लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे. त्यात जर तुम्ही अटींमध्ये बसत नसाल आणि तुम्ही तरीही योजनेचा लाभ घेतला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

धुळ्यातील एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा दुबार लाभ घेतला आहे. त्यामुळे या महिलेचे पैसे परत घेण्यास आले आहे. या योजनेत ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही त्यांचेही पैसे परत घेतले जाऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? (Ladki Bahin Yojana Eligibility Criteria)

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी हवे.

महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावे. आमदार किंवा खासदाराच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.

ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. चारचाकी वाहन असल्यासदेखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.

जर महिला सरकारी नोकरीत असतील तर त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

SCROLL FOR NEXT