

सोनं-चांदीच्या दरात चढ -उतार सुरूच आहे. बुधवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. तर आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली. आज १ तोळा सोनं २,६१० रुपयांनी महाग झाले. आज तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर १८-२२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळ्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २६१० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,२५,८९० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २६,१०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १२,५८,९०० रुपये खर्च करावे लागतील.
आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. या सोन्याच्या दरात २४०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१५,४०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात २४,००० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,५४,००० रुपये मोजावे लागतील.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोन्याचे दर देखील चांगलेच वाढले आहेत. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १९६० रुपयांनी वाढले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९४,४२० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १९,६०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना ९,४४,२०० रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, आज सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला पण चांदीचे दर स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदीचा १६५ रुपये आहे. तर १ किलो चांदी चांदी खरेदीसाठी आज १,६५,००० रुपये खर्च करावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.