Paneer Roll Frankie Recipe: लहान मुलांसाठी घरीच बनवा चटपटीत आणि चमचमीत पनीर रोल फ्रँकी, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

फ्रँकीसाठी पीठ मळून घ्या

एका भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा, चवीनुसार मीठ आणि थोडे तेल घ्या. पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. काही वेळ पीठ झाकून ठेवा.

Paneer Roll Recipe | Google

पनीरचे तुकडे तयार करा

पनीरचे लांबट तुकडे करून घ्या. एका भांड्यात दही, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर, मीठ आणि आले-लसूण पेस्ट एकत्र करा.

Paneer Roll | GOOGLE

पनीरला मसाला लावा

तयार मसाल्यामध्ये पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित एकत्र करा. पनीरला मसाला चांगला लागण्यासाठी १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा.

Paneer Roll Frankie Recipe

पनीरचे सारण तयार करा

कढईत थोडे तेल किंवा बटर गरम करा. त्यात कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात मसाला लावलेले पनीर घालून चांगले शिजवून घ्या.

Paneer Roll Frankie Recipe

फ्रँकीसाठी पोळी तयार करा

मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून घ्या. त्याच्या पातळ पोळ्या लाटा. तव्यावर थोडे तेल किंवा तूप घालून दोन्ही बाजूंनी पोळी छान भाजून घ्या.

Paneer Roll Frankie Recipe

पोळीमध्ये पनीरचे सारण भरा

तयार पोळीवर हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस लावा. त्यावर पनीरचे सारण, बारीक चिरलेला कांदा आणि कोबी घाला. वरून थोडा चाट मसाला भुरभुरवा.

Paneer Spring Roll

गरमागरम पनीर फ्रँकी सर्व्ह करा

पोळीच्या दोन्ही बाजू दुमडून त्याचा रोल तयार करा. तव्यावर थोडे बटर लावून फ्रँकी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. गरमागरम पनीर रोल फ्रँकी सॉससोबत सर्व्ह करा.

Paneer Roll Frankie Recipe

Dark Chocolate for Period: डार्क चॉकलेट खाल्ल्याने खरंच कमी होतो मासिक पाळीचा त्रास? जाणून घ्या सत्य!

Dark Chocolate for Period | Saam Tv
येथे क्लिक करा