Sanjay Gaikwad : 1992 साली नेत्याच्या घरून IAS अधिकारी गायब, तो सापडलाच नाही; आमदार संजय गायकवाडांचा गौप्यस्फोट

Sanjay Gaikwad Latest news : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बीडच्या राजकारणावर बोलाताना गौप्यस्फोट केला आहे. राजकीय नेत्याच्या घरून IAS अधिकारी गायब झाल्याचा गौप्यस्फोट आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
Sanjay Gaikwad
Sanjay Gaikwad NewsSaam tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून महायुतीतच दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीतील भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून बीड प्रकरणात सातत्याने मुंडे बहीण भावाला लक्ष्य केले जात आहे. त्यात आता महायुतीचा घटकपक्ष असलेला शिवसेनेच्या आमदाराची भर पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोठं भाष्य केलं. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

Sanjay Gaikwad
Maharashtra Politics : जयंत पाटलांमध्ये धमक आहे का? सरकारविरोधात लढायची - गोपीचंद पडळकर

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये निषेध मोर्च्याचं आयोजन केलं होतं. या मोर्च्याला मोठ्या संख्येने बीडकरांनी हजेरी लावली. या मोर्च्यात आमदार सुरेश धस यांच्यासहित विरोधकांनी मुंडे बहीण भावावर टीकेचे बाण सोडले. त्यानंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बीडच्या राजकारणावर मोठं भाष्य केलं आहे. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारणही सांगितलं.

Sanjay Gaikwad
Dhananjay Munde :...तर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार; संतोष देशमुख प्रकरणावर धनंजय मुंडेंची मोठी प्रतिक्रिया

आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'कोणता मंत्री या घटनेत सहभागी आहे, हे सांगता येणार नाही. जो कराड आहे, तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्याचा उल्लेख देखील पंकजा मुंडे यांनी एका भाषणात केला होता. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याशिवाय त्यांचं पान हालत नाही. डावा की उजवा हात आहे. तो खंडणीखोर आहे. या प्रकरणात दोन कोटींची खंडणी मागितली. यामुळे हा प्रकार घडला. त्यातून हत्या झाली. त्याचे मागचे गुन्हे आज रेकॉर्डवर नाही'.

Sanjay Gaikwad
Sanjay Gaikwad News : विधानसभेत पक्षातील नेत्यांनी काम न करता गद्दारी केली; आमदार संजय गायकवाड यांच्या गौप्यस्पोटाने शिवसेनेत खळबळ

'आपल्या बुलढाण्यात १४२ बंदूक लायसन्स आहेत. एकट्या बीडमध्ये हजारहून अधिक बंदुकीचे लायसन्स आहेत. खुलेआम बंदूक चालवता. १९९२ साली एका राजकीय नेत्याच्या घरातून आयएएस गायब झाला होता. संपूर्ण बीडमध्ये गुन्हेगारीचं स्वरुप पाहायला मिळत आहे. तिकडे काहीच नियंत्रण आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारीत हिटलिस्टवर असेल तर तो बीड जिल्हा आहे. तो राग जनतेच्या मनात आहे. त्यामुळे सगळे पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आहे. ते स्वाभाविक आहे. ती जनतेची प्रतिक्रिया आहे. शासन आरोपीला पकडायला अपयशी झालं. गैरसमज निर्माण होतो की, त्यांना पाठिशी घातलं जातं का, असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com