Sanjay Gaikwad News : विधानसभेत पक्षातील नेत्यांनी काम न करता गद्दारी केली; आमदार संजय गायकवाड यांच्या गौप्यस्पोटाने शिवसेनेत खळबळ

Buldhana News : विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यात बुलढाणा मतदार संघातून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा अवघ्या ८०० मतांनी विजय झाला.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSaam tv
Published On

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला असला तरी विधानसभा निवडणुकीत माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझे काम केले नाही. उलट माझ्याच विरोधात महायुती व माझ्या पक्षातील नेत्यांनी गद्दारी केल्याचा गौप्यस्फोट आमदार संजय गावाकवाड यांनी केला आहे. तसेच याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचे देखील आमदार गायकवाड यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यात बुलढाणा (Buldhana) मतदार संघातून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांचा अवघ्या ८०० मतांनी विजय झाला. मात्र हा काठावरील विजय त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्याच पक्षातील नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना माझ्याशी त्यांनी गद्दारी केल्याचं म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत ही आमची इच्छा. शिंदे साहेब वेगळा निर्णय घेणार नाहीत.

Sanjay Gaikwad
Bhor Ghat : भोर घाटातील एसटी वाहतूक बंद; घाट रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने निर्णय

अनिल परब यांना फोन करून कट रचला 

इतकंच काय तर प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर तर भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी अनिल परब यांना फोन करून हा सर्व कट केला. तर माझ्याच पक्षातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांना फोन करून माझ्या विरुद्ध रविकांत तुपकर यांच्या ऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याचे सांगितलं; असेही त्यांनी सांगितले असून शिवसेनेत आता वाद उफाळून आल्याचं चित्र आहे

Sanjay Gaikwad
Nanded Fire : नांदेडच्या सिडको एमआयडीसीत ऑइल कंपनीला आग; कंपनी मालकासह पाच जण गंभीर जखमी

विरोधी पक्षातील उमेदवाराला कोट्यवधी रुपये वाटले

गायकवाड म्हणाले, कि मी या निवडणुकीत एकटाच लढलो व कमी मतांच्या फरकाने विजयी झालो. रविकांत तुपकर यांची उमेदवारी पक्की होती. मात्र प्रतापराव जाधव यांनी फोन केल्यावर उद्धव ठाकरे यांनी उमेदवार बदलला. तर भाजपच्या संजय कुटे यांनी कट रचून अनिल परब यांना संपर्क करून माझ्या विरोधात जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली. इतकेच नाही तर विरोधी पक्षातील उमेदवार यांनी कोट्यावधी रुपये वाटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com