Bhor Ghat : भोर घाटातील एसटी वाहतूक बंद; घाट रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने निर्णय

Mahad News : महाड- भोर घाट रस्तावर भोर हद्दीतील वाघाजाई घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याची खराबी झाली आहे.
Bhor Ghat
Bhor GhatSaam tv
Published On

सचिन कदम 
महाड
: पावसाळ्याच्या दिवसात घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळत असते. यामुळे या दिवसात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. तर दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठे दगड पडल्याने रस्त्याची खराबी झाली आहे. याची दुरुस्ती अद्याप झाली नसल्याने भोर घाट रस्त्यातील धोका लक्षात घेता एसटीची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महाड- भोर घाट रस्तावर (Mahad) भोर हद्दीतील वाघाजाई घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याची खराबी झाली आहे. पावसाळा संपायला दोन महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर देखील या खराब झालेल्या रस्त्याच्या नुकसानीची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. यामुळे या भागात घाट रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे. 

Bhor Ghat
Jalna News : महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर; जालना- वडिगोद्री महामार्गावरील प्रकार

पावसाळ्या पूर्वी पासून सुमारे आठ महिने बंद असलेल्या या घाट रस्त्यावरून आता खाजगी वाहतुक सुरु झाली आहे. मात्र एसटी बस सेवा अद्याप सुरु झालेली नाही. व्यवसाय, बाजार रहाट, नाते संबध या भागात जोडले गेल्याने पुणे जिल्ह्यातील भोर तालुका तसेच (Raigad) रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यातील नागरीकांना ये जा करताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.  

Bhor Ghat
Beed News : रेशीम उत्पादनाबरोबरच विक्रीसाठीही बीड बाजारपेठ अग्रेसर; दोन महिन्यातच १४ कोटींची विक्री

घाट रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी 

भोर घाट रस्त्याची खराबी झाल्याने वाहतुकीसाठी धोकेदायक आहे. यामुळे रायगड आणि पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्ताच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर महाड भोर हा रस्ता सुरु करावा अशी मागणी केली जात आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com