Nanded Fire : नांदेडच्या सिडको एमआयडीसीत ऑइल कंपनीला आग; कंपनी मालकासह पाच जण गंभीर जखमी

Nanded News : नांदेड शहरापासून जवळ असलेल्या सिडको एमआयडीसी परिसरातील तिरुमला ऑइल कंपनीला सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली
Nanded Fire
Nanded FireSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: नांदेड शहरालगत असलेल्या सिडको एमआयडीसी परिसरातील आज सकाळच्या सुमारास तिरुमल्ला ऑइल इंडस्ट्रीज कंपनीला आग लागल्याची घटना घडली. या आग लागली यावेळी कंपनीत काही कामगार काम करीत होते. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत.

नांदेड (Nanded) शहरापासून जवळ असलेल्या सिडको एमआयडीसी परिसरातील तिरुमला ऑइल कंपनीला सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळीच कंपनीत कामाला कामगार दाखल झाले होते. याच वेळी अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला. यामुळे पळापळ सुरु झाली. (fire Brigade)आगीबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. मात्र गाडी येईपर्यंत आग अधिक प्रमाणात पसरली होती. 

Nanded Fire
Beed News : रेशीम उत्पादनाबरोबरच विक्रीसाठीही बीड बाजारपेठ अग्रेसर; दोन महिन्यातच १४ कोटींची विक्री

आगीचे कारण अस्पष्ट 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अद्याप या आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर या परिसरात पसरले. या घटनेने एमआयडीसी परिसरात एकच धावपळ उडाली.

Nanded Fire
Bhor Ghat : भोर घाटातील एसटी वाहतूक बंद; घाट रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने निर्णय

पाच जण जखमी 

सकाळी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरवात केली असतानाच आग लागली. यामुळे आगीत पाच जण जखमी झाले असून यात कंपनीच्या मालकाचा देखील समावेश आहे. या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीच्या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com