Cricket League: पुरुष- महिला खेळाडू एकाच टीममध्ये खेळणार! 2027 मध्ये होणार अनोखी T20 लीग; झहीर खानची मोठी घोषणा

EQUAL Cricket Tournament: झहीर खानच्या कंपनीने पुरुष आणि महिला क्रिकेटपटू एकाच टीममध्ये खेळणाऱ्या EQUAL T20 लीगची घोषणा केली आहे. ऑगस्ट 2027 मध्ये जर्मनीत या स्पर्धेचं पहिलं पर्व रंगणार असून प्रत्येक टीममध्ये 6 महिला आणि 5 पुरुष खेळाडू असणार आहेत.
Cricket League
Cricket Leaguesaam tv
Published On: 

क्रिकेटमध्ये आतापर्यंत पुरुष आणि महिलांचे सामने स्वतंत्रपणे खेळवले जातात. पण आता ही पद्धत बदलण्याच्या दिशेने एक नवा प्रयोग होणार आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या टीमचा सदस्य झहीर खान याच्या कंपनीने पुरुष आणि महिला खेळाडूंची एकत्रित T20 लीग सुरू करण्याची घोषणा केली आहे. 'EQUAL' असं या लीगचं नाव असून, या स्पर्धेत पुरुष आणि महिला क्रिकेटपटू एकाच टीमकडून खेळताना दिसणार आहेत. या लीगचं पहिलं पर्व ऑगस्ट २०२७ मध्ये जर्मनीत होणार आहे.

झहीर खानची सहमालकी असलेली स्टॉकहोममधील अँकर स्पोर्ट्स एबी (Anchor Sports AB) या कंपनीने जर्मन क्रिकेट फेडरेशनसोबत (Deutscher Cricket Bund) पार्टनरशिप केलीये. या दोघांच्या सहकार्याने 'EQUAL' ही T20 लीग सुरू केली जाणार आहे. क्रिकेटमध्ये अशा प्रकारची लीग सुरू करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

Cricket League
IND vs NZ 1st Test: भारताने न्यूझीलंडला विजयासाठी दिलं मोठं आव्हान, २३३ धावांची आघाडी; शेवटच्या दिवशी किवींचं काय होणार?

कशी असेल पुरुष आणि महिला खेळाडूंची एकत्रित टीम?

या लीगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक टीममध्ये पुरुष आणि महिला खेळाडू एकत्र असतील. पहिल्या पर्वात एकूण पाच टीम सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 12 T20 सामने खेळवले जातील. प्रत्येक टीममध्ये १८ खेळाडू असतील. तर मैदानात उतरणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये ६ महिला आणि ५ पुरुष खेळाडूंचा समावेश असेल.

या स्पर्धेत T20 क्रिकेटचे नेहमीचे नियम कायम असणार आहेत. पण पुरुष आणि महिला खेळाडू एकाच टीममध्ये खेळणार असल्याने काही विशेष नियमही तयार केले जाणार आहेत. यामध्ये खेळाडूंची सुरक्षितता, बदली खेळाडूंचे नियम आणि सामन्यादरम्यान होणारे बदल यांचा समावेश असेल. यामुळे सामने योग्य पद्धतीने आणि सुरक्षित वातावरणात खेळवता येतील.

झहीर खान म्हणाला, क्रिकेट सर्वांना एकत्र आणणारा खेळ

या नव्या लीगबाबत बोलताना झहीर खान म्हणाला की, क्रिकेट हा लोकांना एकत्र आणणारा खेळ आहे. युरोपसारख्या नव्या भागांमध्ये क्रिकेटचा प्रसार करायचा असेल तर अधिकाधिक लोकांना या खेळाशी जोडणं गरजेचं आहे. 'EQUAL'सारख्या उपक्रमांमुळे महिला आणि पुरुष दोघांनाही क्रिकेट खेळण्याची, आपलं कौशल्य दाखवण्याची आणि या खेळाच्या विकासात सहभागी होण्याची संधी मिळेल.

Cricket League
WTC 2027 Final: टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा मार्ग खडतर? जाणून घ्या कसं आहे संपूर्ण समीकरण

जर्मनीत क्रिकेटला मिळणार नवं व्यासपीठ

जर्मनीमध्ये आधीपासूनच महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंचा मोठा गट आहे. या दोन्ही गटांना एकाच व्यासपीठावर आणून अधिक चांगल्या पद्धतीने सामने खेळण्याची संधी 'EQUAL'मुळे मिळणार आहे. जर्मन क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष सेव्हरिन वाइस यांनी ही माहिती दिली.

त्यांच्या मते, या लीगमुळे अधिकाधिक लोक क्रिकेटशी जोडले जातील. स्थानिक पातळीवर क्रिकेटचा प्रसार होईल आणि या खेळाला नव्या चाहत्यांपर्यंत पोहोचवता येईल.

जर्मन क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. विग्नेश संकरण यांनीही या लीगचं स्वागत केलं. जर्मनीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या आणि या खेळाबद्दलची आवड वाढत आहे. अशा वेगळ्या स्पर्धेमुळे क्रिकेटला अधिक प्रसिद्धी मिळेल. तसेच नव्या खेळाडूंना स्वतःचं कौशल्य दाखवण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळेल, असं त्यांनी सांगितलं

Cricket League
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीमागे युवराज सिंहचा मोठा वाटा; सामन्याआधी काय दिला होता सल्ला?

पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना एकाच टीममध्ये आणण्याचा नवा प्रयोग

अँकर स्पोर्ट्सचे सहमालक नागेंद्र सिद्धौताम यांनी सांगितलं की, क्रिकेटमध्ये नवे प्रयोग करून स्थानिक पातळीवरील खेळाला बळकटी देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. अनेक वर्षांपासून पुरुष आणि महिला क्रिकेट स्वतंत्रपणे खेळलं जातंय. पण 'EQUAL'च्या माध्यमातून दोघांना एकाच टीममध्ये खेळण्याची संधी दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.