Ladki Bahin Yojana Saam Tv News
बिझनेस

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी आता योजना बंद करण्याची मागणी केली जात आहे. वेळेवर पैसे न मिळत नसल्याने लाडक्या बहिणींना ही मागणी केली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता वेळेवर पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहि‍णींनीच योजना बंद करण्याची मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेत पैसे येण्यास नेहमीच उशीर होतो. त्याच पार्श्वभूमीवर महिलांनी ही मागणी केली आहे.

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)सुरु झाल्यापासून जुलै ते डिसेंबर २०२४ पर्यंत दर महिन्याला वेळेवर पैसे जमा झाले. परंतु त्यानंतर पैसे येण्यास नेहमी उशीर झाला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून एकाही महिन्यात लाडक्या बहि‍णींना वेळेवर पैसे मिळाले नाहीत. जून महिन्याचा लाभ अजूनही महिलांच्या खात्यात जमा झाल नाही. त्यामुळे महिलांनी ही मागणी केली आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे. १० लाखांहून अधिक महिलांचा लाभ बंद झाला आहे. याच पार्श्वभूर्मीवर सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ५३ महिलांनी ही मागणी केली आहे. आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो, आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावे, अशी मागणी योजनेच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे.

अनेक महिन्यांपासून वेळेवर लाभ नाही

जवळपास गेल्या ६ महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा वेळेवर लाभ मिळत नाहीये. अनेक महिलांचे या योजनेच्या पैशातून काही महत्त्वाची कामे अवलंबून असतात. परंतु योजनेचा लाभ खूप उशिरा मिळत असल्याने अनेक कामे रखडली जातात. यामुळेच महिलांनी योजना बंद करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT