Onion Price : सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक निम्म्यावर; दर मात्र स्थिर

Solapur News : कांद्याचे भाव वाढत नसून सरासरी कांद्याला १५०० ते १८०० रुपये क्विंटल दर बाजारात मिळत आहे. क्वचित एखाद्या शेतकऱ्याच्या चांगल्या कांद्याला २००० ते २१०० रुपये पर्यंत दर मिळत आहे
Onion
Onion Saam tv
Published On

सोलापूर : शासनाने निर्यात शुल्क देखील हटवले असून कांद्याची आवक देखील कमी झाली आहे. तर  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शंभर गाड्या कांद्याची आवक होत आहे. असे असतांना देखील कांद्याला योग्य दर मिळत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या कांद्याला सरासरी १५०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. 

सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शंभर गाड्या कांद्याची आवक होत आहे. आषाढी एकादशी असल्यामुळे जास्त शेतकरी वारकरी असल्यामुळे वारीत सहभागी झाले आहेत. यामुळे मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाली आहे. तरी देखील कांद्याचे भाव वाढत नसून सरासरी कांद्याला १५०० ते १८०० रुपये क्विंटल दर बाजारात मिळत आहे. क्वचित एखाद्या शेतकऱ्याच्या चांगल्या कांद्याला २००० ते २१०० रुपये पर्यंत दर मिळत आहे.

Onion
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांचे दोन गट; एकीकडे विरोध तर दुसरीकडे महामार्गाचे शेतकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन

मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची आवक सोलापूर जिल्हा आणि विजयपुरा जिल्हा येथून होत आहे. तर सोलापूर जिल्ह्यातून आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळला कांदा पाठविला जात आहे. आवक कमी असूनही कांद्याचे दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करत आहेत.

Onion
Jalgaon Accident : मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

यंदा आवक निम्म्यावर 

दरम्यान मागील वर्षी याच दिवसात बाजार समितीमध्ये २०० ते २५० गाड्या कांद्याची आवक झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याची आवक कमी आहे. यंदा अवकाळी पावसात अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आहे. ऐन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. याचा परिणाम देखील सध्याच्या कांदा आवकवर पाहण्यास मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com