Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांचे दोन गट; एकीकडे विरोध तर दुसरीकडे महामार्गाचे शेतकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन

Nanded News : महामार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची जमिनी संपादित केल्या जाणार असून यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे. यामुळे या सर्व जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांकडून महामार्गास तीव्र विरोध
Shaktipeeth Mahamarg
Shaktipeeth MahamargSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध होत असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांचा एक गट या महामार्गाच्या समर्थनार्थ आहे. कारण या शेतकऱ्यांच्या हस्ते शक्तीपीठ महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. अर्थात महामार्गाच्या विषयात शेतकऱ्यांमध्ये दोन पडल्याचे यावरून दिसून येत आहे.

नागपूर ते गोवा असा नव्याने होत असलेला शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील १२ जिल्ह्यांमधून जात आहे. महामार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची जमिनी संपादित केल्या जाणार असून यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे. यामुळे या सर्व जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांकडून महामार्गास तीव्र विरोध केला जात असून शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. मात्र आता महामार्गाला समर्थन करणारा दुसरा शेतकरी गट उभा राहिला आहे. 

Shaktipeeth Mahamarg
Nagpur Crime : आजीजवळ झोपलेल्या पाच वर्षीय मुलीसोबत घडले भयंकर; आजीच्या सतर्कतेने अनर्थ टळला

शेतकऱ्यांनी केले सीमांकन मोजणीचे भूमिपूजन 

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत. तर नांदेडच्या हदगाव तालुक्यात देखील अशीच परिस्थिती आहे. हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सीमांकन मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध केला. तर दुसरीकडे याच हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सीमांकन मोजणीचे भूमिपूजन केले आणि शक्तिपीठ महामार्गाला कुठलाही विरोध नसल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे या महामार्गावरून आता शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याच समोर आला आहे.

Shaktipeeth Mahamarg
Bogus Seeds : बियाणे लागवड पण उगवण नाही; बोगस बियाणांनी शेतकरी हैराण, दुबार पेरणीची वेळ

विरोध मात्र कायम 

महामार्ग साकारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जाणार आहेत. यामुळे १२ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. यामुळे मागील दोन दिवसांपासून रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात येत आहे. तसेच महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची देखील अडवणूक करत मोजणी न करताच त्यांना परत पाठविले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हा विरोध कायम राहणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com