Nagpur Crime : आजीजवळ झोपलेल्या पाच वर्षीय मुलीसोबत घडले भयंकर; आजीच्या सतर्कतेने अनर्थ टळला

Nagpur News : बालिका आजीसोबत घरात झोपलेली होती. दरवाजा बंद असतानाही संशयित आरोपी श्रवणकुमार याने शिताफीने घरात प्रवेश केला. त्यानंतर आजीजवळ झोपलेली थेट मुलीपर्यंत पोहचला चिमुकलीला उचलून घेऊन जाऊ लागला
Mankapur Police Station
Mankapur Police StationSaam tv
Published On

पराग ढोबळे 

नागपूर : नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत घरामध्ये आजीजवळ झोपलेली पाच वर्षीय बालिकेला एकाने उचलून नेत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. चाहूल लागताच आजी उठली असता तिने आरडाओरड केली. यामुळे पुढील अनर्थ टळला असून आजीच्या सतर्कतेमुळे नात सुरक्षित आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्य हद्दीत २७ जुनच्या पहाटे हि घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटेनच्या दिवशी ४ वर्ष ११ महिन्याची बालिका आजीसोबत घरात झोपलेली होती. दरवाजा बंद असतानाही संशयित आरोपी श्रवणकुमार याने शिताफीने घराच्या आत प्रवेश केला. त्यानंतर आजीजवळ झोपलेली थेट मुलीपर्यंत पोहचला.

Mankapur Police Station
Kalyan Crime : कल्याणमध्ये भरदुपारी घरफोडी; ४ लाख रुपयांचा ऐवज लांबविला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

आजीच्या सतर्कतेने बालिका सुरक्षित  

या चिमुकलीला उचलून घेऊन जाऊ लागला. दरम्यान घरात काही तरी चाहुल लागल्याने आजी अचानक जाग आली. तिने पहिले असता जवळ झोपलेली नात जवळ नसल्याचे पहिले असताना आरोपी नातीला उचलून नेत असल्याचे दिसला. हे पाहुन आजीने जोरात आरडाओरड सुरू केला. यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपीने घाबरून बालिकेस घरातच सोडून पळून गेला.

Mankapur Police Station
Pandharpur Accident : विठ्ठल भेटीची आस अपूर्ण; पायी दिंडीतील तरूण वारकऱ्याचा पंढरपूरजवळ अपघात

५५ सिसिटीव्ही तपासत संशयित ताब्यात 

दरम्यान आजीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात अपहरणाच्या उद्देशाने घरात घुसखोरी केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर मानकापूर पोलिसांनी तत्काळ परिसरातील ५५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून आरोपीची ओळख पटवली आणि सापळा रचून आरोपी श्रवणकुमार शिवराम यादव याला बेड्या ठोकल्या आहे. तर आरोपीने पोलीस चौकशीत गुन्हा कबुल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com