Nishikant Dubey
Nishikant Dubeyx

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Nishikant Dubey : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करत मराठी विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. याआधीही अनेक उत्तर भारतीय नेत्यांनी मराठी विरोधात वक्तवय केले आहे.
Published on

भाजपचे खासदार निशिकांत दूबे हे काही पहिले राजकारणी नाही ज्यांनी ... जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठीचा जागर होतो तेव्हा तेव्हा मराठी द्वेष्ट्यांनी डोळे वटारत महाराष्ट्राकडे पाहील्याचं आतापर्यंत अनेकदा दिसून आलंय .... महाराष्ट्रात रोजी रोटी कमवायची , आणि त्याच परप्रांतियांनी कायम मराठीला आणि इथल्या मराठी माणसाला गृहित धरायचं . आतापर्यंत मराठीचा द्वेष करत प्रसिध्दचं राजकारण करण्याचा प्रयत्न नेहमीच झालाय ... आता तर बिहार निवडणूक तोंडावर आहे म्हणजे .. भाषेच्या राजकारणाचा वापर होणारचं

लालू प्रसाद यादव, मा. मुख्यमंत्री बिहार

- मुंबईवर केवळ मराठी माणसांचा हक्क नाही, राज ठाकरेंवर युएपीए कायद्यांतर्गत कारवाई करा

- २००८ ला मराठी माणसांनी महाराष्ट्रातील नोकऱ्या परप्रातिंयांना मिळाल्याविरोधात आंदोलन केल्यानंतर लालूप्रसाद यादवांनी हे वक्तव्य केलं. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. लालू प्रसाद यादव बिहारी माणसाचे छत्र झाले . तेच अमसिंहांनीपण केलं

Nishikant Dubey
MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

अमरसिंह, समाजवादी नेते

- मुंबई कुणाच्या बापाची नाही असं वक्तव्य करुन महाराष्ट्रालातील मराठी माणसाला आणि 105 हुतात्मांचा अपमान केला होता.

राम विलास पासवान

- मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. ती केवळ मराठी माणसाची नाही. इथे प्रत्येक भारतीयाला राहण्याचा आणि काम करण्याचा हक्क आहे.

- मुंबईतील मराठी माणसांना अक्कल शिकवण्याचा हा प्रयत्न फक्त परप्रांतियांनी केलेला नाही तर मुंबईच्या जिवावर मोठं होणाऱ्या अबू आझमींनी मराठीत आमदारकीची शपथ घेणार नाही म्हणत मराठी माणसाला डिवचलं.

Nishikant Dubey
Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

भय्याला दिली ओसरी ... भय्या हात पाय परसी ही मराठीतली म्हण आजही जशीच्या तशी लागू होते ... परप्रातीयांना विरोध नाही देश म्हणून एक आहोतचं मात्र म्हणून दुस-याच्या घरात दादागिरी करण्याचा अधिकार मात्र या परप्रतियांना कोणी दिला ... महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी मतांच्या काही तुकड्यांसाठी महाराष्ट्राची अस्मिता वेशीवर टांगू नये ....

Nishikant Dubey
Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com