
Rajshree More News : अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि राखी सावंतच्या कधी जिवलग मैत्रीण, तर कधी कट्टर विरोधक म्हणून चर्चेत असलेल्या राजश्री मोरे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा, राहिल शेख आणि राजश्री मोरे यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राजश्रीची पोलिसांकडे तक्रार
या घटनेनंतर राजश्रीने संबंधित आरोपीविरोधात पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. तिने एफआयआरची कॉपी देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिचा आरोप आहे की, ही घटना अपघात नव्हता, तर एक पूर्वनियोजित हल्ला होता. काही दिवसांपूर्वी मराठी भाषेबाबत दिलेल्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला हेतूपुरस्सर लक्ष्य करण्यात आले.
राजश्रीने म्हटले होते की, "मुंबईत राहणाऱ्यांवर मराठी भाषा थोपवणे चुकीचे आहे. स्थानिक मराठी लोकांना मेहनत करायला शिकवले पाहिजे, कारण उत्तर भारतीय आणि इतर प्रवासी मुंबई सोडले तर इथली परिस्थिती आणखी वाईट होईल." या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि वर्सोवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. नंतर राजश्रीने माफी मागून तो व्हिडीओ हटवला, मात्र वाद अजूनही शांत झालेला नाही.
"माझा हेतुपुरस्सर पाठलाग केला जातोय" – राजश्री मोरे
राजश्रीचा आरोप आहे की, मराठी भाषेवरील वक्तव्यानंतर ती सातत्याने टारगेट केली जात आहे. हा अपघात अचानक घडलेली घटना नसून, नियोजनबद्ध हल्ला होता. तिने मनसे कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे की, ते तिच्या जीवाला धोका पोचवत आहेत आणि तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सध्या पोलिसांनी राहिल शेखविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणतीही अटक करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर या प्रकरणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नागरिक आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
राजश्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की, रविवारी रात्री अंधेरी परिसरात एक व्यक्ती नशेच्या अवस्थेत त्यांच्या गाडीवर आदळला. राजश्रीचा दावा आहे की, हा व्यक्ती सामान्य नव्हता, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा – राहिल जावेद शेख होता. अपघातानंतर परिस्थिती अधिक बिघडली जेव्हा आरोपीने राजश्रीला उघडपणे धमकावले.
राजश्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत आक्षेपार्ह भाषेत गालिगप्पा करताना आणि "भ** पैसे घे" असे म्हणत धमकी देताना दिसतो. तो पुढे म्हणतो, "मी जावेद शेखचा मुलगा आहे, पोलिसांना सांग आणि बघ मग काय होतं." या सगळ्या प्रकारात त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात राजकीय दादागिरीची झलक दिसून आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.