
सागर निकवाडे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने पात्र महिलांच्या खात्यात 1500 जमा केल्याने जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाची गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच बँकांबाहेर रांगा लागल्या होत्या आणि पैसे काढण्यासाठी महिलांनी तासनतास प्रतिक्षा केली.
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी बँकांतील अकार्यक्षमता अपुरी कर्मचारी संख्या आणि स्लो सिस्टम यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी महिलांना तासभर उभं राहावं लागलं. काही जेष्ठ महिलांना तर बसायचीही व्यवस्था नव्हती, अशी तक्रारही त्यांनी केली.
बँक व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार, सकाळपासून गर्दीचे प्रमाण खूप वाढले आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र एकाच वेळी हजारो महिलांनी येऊन गर्दी केली असल्यामुळे प्रक्रिया मंदावली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये समाधान जरूर आहे, मात्र या योजनेंतर्गत लाभ देताना पायाभूत सोयीसुविधा आणि व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे चित्र समोर आले आहे...
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ४ जुलै रोजी याबाबतची माहिती दिली होती. ट्वीट करत अदिती तटकरे यांनी 'जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरु झाला आहे. या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत, असे म्हटले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.