Pune : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Pune News : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे शहरातील कोंढवा आणि बिबवेवाडी येथून २६ लाख रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Pune News
Pune Newsx
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात तब्बल २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी पुण्यातील कोंढवा भागातून १५ लाख तर, बिबवेवाडीमधून ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे शहरातील २ भागात जाऊन ही कारवाई केली.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरात दोन ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १५ लाख रुपयांचे अफिम तर, ११ लाख रुपयांचे एम डी जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थ प्रकरणामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केले आहे. या दोघांचे कुठले रॅकेट आहे याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Pune News
kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी कर्मचारी गस्तीवर असताना कोंढवा परिसरात एक व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे ७४९ ग्रॅम अफिम हे अमली पदार्थ मिळून आले. या ७४९ ग्रॅम अफिम ची किंमत १४ लाख ९८ हजार रुपये इतकी आहे. भगीरथराम रामलाल बिश्नोई असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune News
MNS: XXX पैसे घे अन् चल निघ.. मनसे नेत्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत राडा; मराठी इन्फ्लूएन्सरला भररस्त्यावर शिवीगाळ, VIDEO व्हायरल

दुसऱ्या कारवाईत, पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक २ चे अधिकारी ५ जुलै रोजी बिबवेवाडी परिसरात गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ११ लाख रुपये किमतीचा एम डी हा अमली पदार्थ मिळून आला. विठ्ठल रघुनाथ कराडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune News
Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com