Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती

Hindustani Bhau Video: मराठीच्या मुद्द्यावरून सध्या सुरू असलेल्या वादात आता हिंदुस्तानी भाऊने देखील उडी घेतली आहे. त्याने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत राज ठाकरे यांना कळकळीची विनंती केली आहे.
Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती
Hindustani Bhau On Raj ThackeraySaam Tv
Published On

सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर आणि हिंदुस्तानी भाऊ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकास जयराम पाठकने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महत्वाची विनंती केली आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. 'परराज्यातून आलेल्या गोरगरिबांना मारू नका. मराठी भाषा शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकवली गेली पाहिजे पण गरिबांना मारणं हे चुकीचे आहे. असं करून तुम्ही हिंदूत्वाला लांब करत आहेत.', अशा शब्दात हिंदुस्तानी भाऊने राज ठाकरे यांना विनंती केली.

हिंदुस्तानी भाऊने पोस्ट केलेल्या या व्हिडीओत त्याने सांगितले की, 'माननिय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मी विनंती करतो की, साहेब या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावननगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हा गर्व नाही हा माज आहे. मराठी असल्याचा आम्हाला गर्व नाही तर माज आहे. साहेब पण या मराठीच्या नावावर इथे आलेल्या हिंदुस्तानमधील हिंदू लोकांना मारणं चुकीचे आहे. शाळेत असो किंवा कॉलेजमध्ये असो मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. यासाठी जेवढं तुम्हाला ताकद लावायची आहे ती लावा साहेब. पूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे. पण साहेब गोरगरिबांना मारणं चुकीचे आहे खूप चुकीचे आहे.

आपल्या लोकांसोबत त्यांनी असं केलं तर याची भिती व्यक्त करत हिंदुस्तानी भाऊ म्हणाला, 'ते आज इथे नोकरी करायला आले आहेत. आज आपली पण महाराष्ट्रातील लोकं खूप अशा राज्यात शिकायला, काम करायला गेली आहे. तिथली लोकं हे सर्व बघत आहेत की आपल्या लोकांना मारलं जातंय एका भाषेसाठी आणि फक्त मराठी भाषेसाठी. जर त्या लोकांनी आपल्या मराठी माणसासोबत असं केलं. तुम्ही इकडे आला आहात तर तुम्ही इथे याच भाषेत बोला असं जर त्यांनी केलं तर तेव्हा काय करणार साहेब. मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड असते. हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब. कारण बाळासाहेबांनंतर एक सावली बघितली जाते ती राजसाहेबांमध्ये बघितली जाते.'

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती
Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

हिंदुत्वाबाबत बोलताना हिंदुस्तानी भाऊ म्हणाला की, 'इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं ऐकायला आल्यानंतर अंगावर काटे उभे राहतात. ते होते हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर तुम्ही ही ओळ बोलताना अंगावर काटे उभं राहतात. तर तुम्ही हिंदुत्वासाठी बोला. प्रत्येक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये मराठी भाषा बोललीच पाहिजे, शिकवली पाहिजे हे ठिक आहे पण गोरगरिबांना मारून त्यांना जबरदस्ती करून तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करत आहात. ते पण आपले हिंदू बांधव आहेत. त्या हिंदूत्वाला तुम्ही लांब करत आहेत. तुमच्यापासून ती लोकं लांब जात आहेत. जे हिंदू बांधव तुमच्याकडे आशेने बघत होते की हाच एक व्यक्ती आहे जो हिंदुत्वासाठी बोलतो त्या लोकांच्या मनात आज तुमच्याबाबत चुकीचे आले आहे.

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती
Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

'राजकारण करा साहेब पण हे राजकारण तुम्ही कुणासोबत करत आहेत. ज्या लोकांनी बाळासाहेबांचा मान नाही ठेवला. त्यांच्यासोबत जाणाऱ्यांसोबत तुम्ही युती करून बसलात साहेब. जी बाई बाळासाहेबांना थेरडा बोलली होती ती त्यांच्या पक्षात आहेत त्यांच्यासोबत तुम्ही जाणार आहात का? वीर सावरकरांबद्दल अपशब्द बोललेल्या लोकांबरोबर ती लोकं जाऊन बसले आहेत. त्याच्यासोबत तुम्ही युती करणार आहात का? ज्या लोकांनी श्रीरामाबद्दल चुकीचे बोलले त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन बसणार आहात का? साहेब हा हिंदूसमाज तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघत आहे. तुमच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा विश्वास तोडू नका. कारण मी तुमच्या खूप मुलाखती पाहिल्या की परत कधी त्यांच्यासोबत उभा नाही राहणार, आज त्याच्यासोबत युती करणार नाही. ज्या लोकांनी तुम्हाला संपलेला पक्ष असे म्हटेल आहे अशा लोकांसोबत तुम्ही युती करताय का?', असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केला आहे.

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती
Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

तसंच, 'काही शिवसैनिकांना वाईट वाटेल की मी काय बोलतो. पण तुम्ही बाळासाहेबांची भाषणं ऐका. मी पण बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी देखील त्यांच्या पावलावर चालतो. तर कमेंट बॉक्समध्ये काही ज्ञान देण्याआधी त्यांनी बाळासाहेबांची भाषणं ऐका नंतर ज्ञान द्या. साहेब तुमच्यावर पूर्ण हिंदू समाज प्रेम करतो आणि करत राहिल. फक्त गोरगरिब आणि बाहेरच्या राज्यातून आले आहेत ते देखील आपले भाऊ आहेत त्यांना नका मारू. दोन पैसे कमवायला आले आहेत. पोरा बाळांना ते सांभाळत आहेत. हिंदूत्वाच्या विरोधात असतील तर त्यांना आपण घ्यायचेच आहे. मी ऐवढेच सांगेल. मी माझी कळकळीची विनंती मनसैनिक आणि शिवसैनिकांना सांगितली. हिंदुत्वाला तोडू नका. जय महाराष्ट्र!', असे देखील हिंदुस्तानी भाऊ म्हणाला.ी

Hindustani Bhau On Raj Thackeray: मारणं खूप सोपं असतं पण एकत्र आणणं अवघड, हिंदुस्तानी भाऊची राज ठाकरेंना विनंती
Thakrey Brothers Vijayi Melava : अखेर तो क्षण आलाच! राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहून महिलेला अश्रू अनावर; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com