Thane : आई की, हैवान? ठाण्यातील महिलेचा लेकीला अमानुष मारहाण करतानाचा Video Viral

Thane News : ठाण्यातील साबेगाव येथे एका महिलेने तिच्या साडेचार वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनंतर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Thane News
Thane NewsSaam Tv
Published On

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या साबेगाव या ठिकाणी म्हात्रे बिल्डिंग मध्ये राहणारे गोडीमेटाले परिवारातील यशोदा ब्राह्मया २८ वर्षीय आईने आपल्या साडेचार वर्षांची चिमुकलीला स्टीलच्या चमच्याने बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ त्याच आईच्या मोठ्या मुलगीने मोबाईल मध्ये कैद केला.

मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा ब्राह्मया या महिलेने तिच्या साडेचार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. घरातील इतर सदस्यांनी महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, महिला आणि मुलीच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण महिला तरीही मुलीला मारत राहिली. महिलेच्या मोठ्या मुलीने शेवटी मोबाईलमध्ये हा मारहाणीचा व्हिडीओ बनवला.

Thane News
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवला आणि साडेचार वर्षीय चिमुकलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार यशोदा ब्राह्मया २८ वर्षीय आई वरती भारतीय न्याय संहिता सेक्शन ११५(२), ११८(१), ७५ बालसरंक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशन PSI अनिल सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Thane News
Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

साडेचार वर्षीय चिमुकलेला बेदम मारहाण करणारी आई यशोदा ब्राह्मया हिला नोटीस देऊन ठेवण्यात आलेला आहे आणि मुलीला महिला व बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Thane News
Railway : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पहिला आरक्षण चार्ट प्रसिद्ध केला जाणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com