
इराण आणि इस्रायल यांच्यातील 12 दिवसांच्या युद्धाने पश्चिम आशियातील राजकारण आणि सुरक्षेला हादरे दिले. दोन्ही देशांनी आता संयम बाळगला असतानाच इस्त्राईलने येमेनवर हल्ला केला आहे. इस्रायलने येमेनच्या हुथी बंडखोरांना लक्ष्य केले आहे. हुथी एक शिया मुस्लिम गट आहे. या गटाला इराणचा पाठींबा आहे. हुथी गट येमेनच्या गृहयुद्धात 2014 पासून सक्रिय आहे. त्यांनी येमेनची राजधानी साना आणि इतर अनेक भागांवर नियंत्रण ठेवले आहे.
इस्त्राईलचा येमेनवर हल्ला
इस्रायलने 'ऑपरेशन ब्लॅक फ्लॅग' द्वारे येमेनच्या 3 प्रमुख बंदरांवर हल्ला केला. अल हुदायदाह, रास इसा आणि सलिफ या बंदरांवर आणि रास कनातिब पॉवर प्लांटवर हवाई हल्ले केले.
या हल्ल्यांमध्ये 'गॅलेक्सी लीडर' जहाजालाही लक्ष्य करण्यात आले. हे जहाज 2023 मध्ये हुथींनी ताब्यात घेतले होते. इस्रायलने या भागातील नागरिकांना हा परिसर रिकामा करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला. इशाऱ्याच्या काही तासांतच हवाई हल्ले सुरू झाले.
इस्रायली हल्ल्यानंतर हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय होऊन क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर दिल्याचा दावा हुथी बंडखोरांनी केला आहे. दरम्यान इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी येमेनला इशारा दिला आहे.
इस्त्राईलचा हुथी बंडखोरांना गंभीर इशारा
- हुथींनी केलेल्या कोणत्याही कारवाईची त्यांना किंमत मोजावी लागेल. येमेनची अवस्था इराणसारखीच होईल. जो कोणी इस्रायलविरुद्ध हात उचलेल त्याचा हात कापला जाईल.
- इस्रायल डिफेन्स फोर्सने दावा आहे की हुथी बंडखोर इराणकडून शस्त्रे मागवून इस्रायल आणि त्याच्या मित्र देशांविरुद्ध दहशतवादाचा कट रचत होते.
इस्रायल-हमास संघर्ष सुरू झाल्यापासून, हुथी बंडखोर इस्रायलवर सतत क्षेपणास्त्रे डागत आहेत. याशिवाय, ते लाल समुद्रात इस्रायल आणि पाश्चात्य देशांच्या जहाजांना देखील लक्ष्य करत आहेत. त्यामुळेच इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्राईलने येमेनकडे आपला मोर्चा वळवला आहे. शत्रुच्या मित्रालाही धडा शिकवणाऱ्या इस्त्राईलच्या पुढील हालचालींकडे जगाचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.