Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Raigad Suspicious Boat : रायगडच्या कोलेई समुद्रकिनारी संशयित पाकिस्तानी बोट आल्याचा संदेश तटरक्षक दलाने दिला होता. ही संशयित गोष्ट बोट नसून फ्लोटिंग बोया असल्याची माहिती समोर आली आहे.
Raigad Suspicious Boat
Raigad Suspicious BoatX
Published On

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Raigad : रायगडमधील मुरूडच्या कोलेई समुद्रकिनारी संशयित बोट आढळली होती. पाकिस्तानमधून ही बोट भारतात आल्याचे म्हटले जात होता. आता या बोटीसंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे. ही बोट नसून फ्लोटींग बोया असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलेई समुद्रकिनारी आढळून आलेली बोट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ती संशयास्पद वस्तू म्हणजे मासेमारीसाठी वापरण्यात येणारा बोया असल्याचे समोर आले आहे. तटरक्षक दलाच्या शोधमोहीमेत ही बाब स्पष्ट झाली असून रायगड पोलिसांनी याबाबतचा खुलासा केला आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

Raigad Suspicious Boat
MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

मच्छीमार, कोळीबांधव जेव्हा मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात, तेव्हा जाळी बुडून जाऊ नये यासाठी फ्लोटींग बोयाचा वापर केला जातो. हा फ्लोटींग बोया पाकिस्तानहून भारतीय समुद्र हद्दीत वाहून आलेला आहे. अशाच प्रकारचा पाकिस्तानी फ्लोटींग बोया जानेवारी महिन्यात गुजरातच्या ओखा किनाऱ्यावर आढळून आला होता.

Raigad Suspicious Boat
Thane : आई की, हैवान? ठाण्यातील महिलेचा लेकीला अमानुष मारहाण करतानाचा Video Viral

काल रात्री संशयित पाकिस्‍तानी बोट कोर्लई जवळच्‍या समुद्रात आली असल्‍याचा संदेश तटरक्षक दलाने दिला होता. त्‍यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती. आता मात्र ती बोट नसून फ्लोटींग बोया असल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍याने सर्वांचे टेन्शन कमी झाले आहे. ही बोया पाकिस्तानमधून वाहून भारतातील कोलेई समुद्रकिनारी वाहून आली.

Raigad Suspicious Boat
Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com