Roman Starovoit News
putinSaam tv

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Roman Starovoit : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढल्यानंतर मंत्र्याने काही तासांतच आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Published on

मॉस्को : रशियाच्या माजी वाहतूक मंत्री रोमन स्टारोवोईट यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष क्वादिमीर पुतिन यांनी रोमन यांना मंत्रिमंडळातून काढलं. रशियाच्या तपास समितीचे प्रवक्ता स्वेतलाना पेट्रेंका यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. रोमन यांनी मॉस्कोच्या ओडिंटसोवोमध्ये कारमध्ये आत्महत्या केली. रोमन हे कुस्कर क्षेत्राचे गवर्नर देखील होते.

कारमध्ये आढळला मृतदेह

पेट्रेंको यांनी सांगितंलं की, रोमन यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तपास अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. पुतिन हे रशियाच्या हवाई वाहतूक आणि सागरी वाहतुकीत एकानंतर एक येणाऱ्या अडथळ्यामुळे नाराज होते. यामुळे पुतिन यांनी रोमन स्टारोवोईट यांना मंत्रिमंडळातून काढलं होतं.

Roman Starovoit News
Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

रशिया सरकारकडून रोमन स्टारोवोईट यांच्य मंत्रिमंडळातून काढल्याचं अधिकृत कारण देण्यात आलेलं नाही. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, त्यांचा कारमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोळी लागल्याने त्यांचं शरीर रक्ताने माखलं आहे. 'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, स्टारोवोइट यांनी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडली. ही पिस्तुल त्यांना गिफ्ट म्हणून देण्यात आली होती. त्यांना ही पिस्तुल २०२३ साली मंत्रालयाने दिली होती.

Roman Starovoit News
Maharashtra Politics : महायुती आणि मविआला हादरा; राज्यात नव्या आघाडीची नांदी, कुणाला फायदा अन् फटका?

रोमन यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आलं होतं. युक्रेनच्या दिशेने येणाऱ्या ड्रोनच्या धोक्यामुळे रशियाच्या सर्वात मोठ्या विमानतळावरील २८७ विमाने थांबण्यात आल्या होत्या. त्यानंतर एक दिवसांनी पुतिन यांनी मोठा निर्णय घेतला. पुतिन यांनी रोमन यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं. याव्यतिरिक्त, ६ जुलै रोजी उस्त-लुगा बंदरगाहावर 'इको विजार्ड' टँकरमध्ये स्फोट झाला. त्यामुळे अमोनियाची गळती झाली. त्यावेळी आपत्कालीन प्रक्रिया राबवावी लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com