
राज्यात सध्या नवनव्या राजकीय समीकरणाचे वारे वाहतायत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता नव्या आघाड्यांच्या चर्चेला सुरुवात होऊ लागलीय. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने केलीय. करण वंचित सोबत बिघाडी झाल्यानंतर आता नवा भिडू एमआयएमने शोधलाय. राज्यातील नाही तर राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाला सोबत घेण्यासाठीची रणनीती सुरू केलीय.
छत्रपती संभाजीनगरमधील माजी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या घरी झालेल्या चहापानावरून नव्या राजकीय समीकरणाची आणि नव्या आघाडीची चर्चा सुरू झालीय. ‘जय भीम जय भीम‘ चा नारा लावणाऱ्या एमआयएमने वंचितशी फारकत घेतल्यानंतर नवा भिडू सोबत घेण्यासाठी बैठका सुरू केल्या आहेत. राज्यातल्या कोणत्या पक्षासोबत जाण्यापेक्षा थेट देश पातळीवरील चर्चेत असलेल्या चंद्रशेखर आजाद रावण यांच्या आझाद समाज पार्टी सोबत जाण्याची रणनीती सुरू असल्याची चर्चा सुरू झालीय.
एमआयएमने २०१९ मध्ये वंचितला सोबत घेऊन एक खासदारकी आणि आमदारकी पदरात पाडून घेतली. मात्र, त्यानंतर वंचित आणि एमआयएमची फारकत झाली. पुढे 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित आणि MIM या दोघांनीही स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यात दोघांनाही यश मिळू शकले नाही. बहुतेक हा धडा घेऊन आता एमआयएमने विचारपूर्वक पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. जय भीम जय भीम चा नारा देऊन मागच्या दहा वर्षांमध्ये राजकारणात आपली पकड मजबूत करण्या चा प्रयत्न केला. आता त्याच वाटेवर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाकले जात असल्याची चर्चा सुरू झालीय.
राज्यामध्ये दलित आणि मुस्लिम असं समीकरण एकत्र आलं तर फायदा होऊ शकतो हे एमआयएमने मागच्या दहा वर्षात पाहिलेले आहे. एकत्रीकरणाचा फायदा झाला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र लढलं तर यश मिळणार नाही, हे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेशी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय राज्यात सध्या कोणती दुसरी पक्ष संघटना इमाम सोबत येईल असं चित्र दिसत नाही, त्यामुळे दलित आणि बहुजन समाजामध्ये ज्यांचं वजन आहे, त्यांनाच सोबत घेण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय.
वर्षभरात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातली मतांची जातीय समीकरणे कशी विभागलेली आहेत हे स्पष्ट झालय. आता प्रत्येक पक्ष जातीय समीकरणे जुळवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बेस कसा पक्का करता येईल याची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे नवनव्या समीकरणात एमआयएम आणि आझाद समाज पार्टी यांची आघाडी दिसली तर नवल नसेल. विशेष त्याचा फटका हा वंचित बहुजन आघाडीला बसेल आणि फायद्यात एमआयएम राहील अशी शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.