ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर या वर्षी तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी काही उपाय करू शकता. या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्यास महादेवची विशेष कृपा लाभते.
पहिल्या श्रावण सोमवारी लोक सकाळी लवकर उठून अंघोळ करुन भगवान शंकराची पुजा करतात.
एका स्टीलच्या भांड्यात थोडे पाणी भरुन त्यात कच्चे दूध मिक्स करा. ५ बेलच्या पानांवर चंदन लावा आणि ते पाण्यात टाका.
यानंतर ५ लवंग आणि थोडे तांदूळ घाला. तसेच ५ पांढरे फूल या पाण्यात घाला.
भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन हे जल अर्पण करा. पण त्याआधी एका बेलपत्राला चंदन लावून प्रार्थना करुन ते शिवलिंगवर अर्पण करा.
त्यानंतर, भांड्यातून पाणी अर्पण करताना, १०८ वेळा भगवान शंकराचा मंत्र "ओम नमः शिवाय" म्हणा.
असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.