ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जवळपास प्रत्येक भाजीमध्ये लसूणचा वापर केला जातो. लसणामुळे जेवणाची चव वाढते.
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात, जाणून घ्या.
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही लसूणचे सेवन करु शकता.
रिकाम्या पोटी १ ते २ लसूण खाणं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
लसूण खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
दररोज रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.