ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांना टिव्ही आणि मोबाईल पाहण्याची आवड असते. परंतु, हळूहळू त्यांना याचे व्यसन लागते.
मुलांनी मर्यादित प्रमाणापेक्षा जास्त टिव्ही किंवा मोबाईल पाहिल्यास त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
मुलांच्या या वाईट सवयी सोडवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करु शकता.
मुलांसाठी नियम बनवा, त्यांचा स्क्रीन टाइम निश्चित करा.
अनेकदा मुलं एकटी असतात, म्हणून ते बाहेर खेळायला जात नाही. अशावेळी त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जा किंवा त्यांच्यासोबत खेळा.
अनेकदा मुलं खेळण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून ते फोनचा वापर करतात. यासाठी त्यांना बाहेर जाऊन खेळण्याची परवानगी द्या.
मुलांना मोबाईल आणि टिव्हीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना व्यस्त ठेवा. अभ्यास आणि खेळाव्यतिरिक्त त्यांना चित्रकला किंवा योगा सारख्या अॅक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवा.