स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यात नवनवी समीकरण तयार होत आहेत... त्यातच आता वंचितच्या व्होट बँकेला धक्का देण्यासाठी एमआयएमने नवा भिडू शोधलाय.. त्यांनी थेट वंचितला पर्याय उभा करण्यासाठी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीला निमंत्रण दिलंय... तर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी त्यासंदर्भात बैठक झालीय....
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता एमआयएमने सोशल इंजिनिअरिंग सुरु केलीय. तर मुंबईसह शहरी भागात काँग्रेस आणि वंचितची व्होट बँक असलेल्या दलित आणि मुस्लीम व्होटबँक कडे एमआयएमने आपला मोर्चा वळवलाय... त्यामुळेच वंचितकडील दलित मतं आपल्याकडे वळवण्यासाठी आझाद समाज पार्टीचा पर्याय उभा केला जातोय.... कारण राज्यात वंचित बहुजन आघाडीची मजबूत व्होट बँक आहे....
एमआयएमला हवी वंचितची व्होटबँक (HEADER)
2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला 7.64 टक्के मतदान
वंचितला 38 जागांवर तब्बल 37 लाख 43 हजार 200 मतं
2024 लोकसभा निवडणुकीत वंचितला 15 लाख 66 हजार 949 मतं
मात्र जय भीम, जय मीमचा नारा देणाऱ्या एमआयएमने महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांसोबत युतीचं समीकरण जुळवण्यापेक्षा थेट राष्ट्रीय पातळीवरील चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना का गळाला लावलंय....पाहूयात....
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद दलित समाजाचा आकर्षणबिंदू
शहरी भागात चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव
राज्यात दलित आणि मुस्लीम फॅक्टर महत्वाचा
एमआयएम स्वतंत्र लढल्यास अवघ्या 0.4 टक्के मतांपर्यंतच मजल
दलित आणि मुस्लीम मतं एकत्र आल्यास 41 लाख एकगठ्ठा मतं मिळण्याची शक्यता
राज्यातील बहुतांश दलित समाज वंचितच्या बाजूने
खरंतर 2014 नंतर असदुद्दीन ओवैसींनी महाराष्ट्रात एण्ट्री केली.. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभेतही आपला करिष्मा दाखवून दिला... मात्र 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेत फटका बसला... त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भुमिकेत राहण्यासाठीच वंचितला पर्याय उभा करुन एमआयएम आझाद समाज पार्टीसोबत नवं समीकरण सांधतंय... मात्र दलित समाज प्रकाश आंबेडकरांना सोडून चंद्रशेखर आझाद यांच्या मागे उभा राहणार का? यावर युतीचं यश अवलंबून असणार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.