Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : फॉर्म भरलाय, पण पैसेच आले नाहीत; नेमकं कारण काय? कसं तपासायचं? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana Payment Status: लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहेत. परंतु अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत. तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही, अशा पद्धतीने चेक करा.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहे. या योजनेत अनेक महिलांनी अर्ज केले होते. १४ ऑगस्ट २०२४ रोजी महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाला. दोन महिन्याचे पैसे एकत्र जमा करण्यात आले. मात्र, अजूनही अनेक महिलांना पैसे आले नाही. तुमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत त्यामागचे कारण काय आणि ते कसं चेक करायचं ते जाणून घ्या.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत.ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना सप्टेंबर महिन्यात ४५०० रुपये दिले जाणार आहे. तीन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिला जाणार आहे. परंतु त्यासाठी तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुक झाली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही.

खात्यात पैसे जमा झालेत की नाही असे चेक करावे?

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या अकाउंटला पैसे आलेत की नाही ते तुम्हील ४ पद्धतीने चेक करु शकतात.

सर्वप्रथम तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असलेल्या नंबरवर मेसेज येईल. तुमचे पैसे जर जमा झाले असतील तर तुम्हाला त्या मेसेजद्वारे समजेल.

तुम्ही तुमच्या कस्टमर केअरला फोन करुन अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही ते चेक करु शकतात.

तुम्ही ऑनलाइन बँकिंग अॅपद्वारे बँक स्टेटमेंट डाउनलोड करु शकतात. या स्टेंटमेंटवरुन तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही ते समजेल.

तुम्ही बँकेत जाऊनदेखील लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही ते चेक करु शकतात. बँक कर्मचारी तुम्हाला याबाबत सर्व माहिती देतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Crime News : आई अन् मुलीचा नोकराने घेतला जीव, खून करण्याचे कारण वाचून धक्का बसेल

Maharashtra Politics: संजय राऊत यांची ती एक पोस्ट; भाजपने मामा आणि बागुल यांच्या प्रवेशाला लावला ब्रेक

Navapur News : मृत्यूनंतरही आदिवासी बांधवांच्या मरण यातना संपेना; अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीवघेणा प्रवास

Vaishnavi Mahadik: धनंजय महाडिकांच्या थोरल्या सुनबाई काय करतात?

खासगी शाळेकडून पोलिस कर्मचाऱ्याची फसवणूक, मुलांची फी परत न मिळाल्याने डोळ्यात अश्रू

SCROLL FOR NEXT