Badlapur Protest News: 'साहेब, लाडकी बहीण नको, 'सुरक्षित बहीण' योजना पाहिजे..', बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक!

Badlapur Crime Latest News Updates: व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, ज्वेलर्स असोशियन, स्कूल बस असोसिएशनचा बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी नागरिक करत आहेत.
Badlapur Protest News: 'साहेब, लाडकी बहिण नको, 'सुरक्षित बहीण' योजना पाहिजे..', बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक!
Badlapur Protest Latest News:Saamtv
Published On

अजय दुधाणे| बदलापूर, ता. २० ऑगस्ट २०२४

कोलकत्तामधील डॉक्टर तरुणीवरील अत्याचार अन् हत्येच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बदलापूरकर संतप्त होत रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन करत ट्रेनही थांबवल्या आहेत.

चिमुकलींवर अत्याचाराने मुंबई हादरली!

बदलापूरमधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ आणि १३ ऑगस्टला ही घटना घडली. चिमुकली शाळेला जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर अत्याचार झाल्याचे समोर आले. याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आले.

नागरिकांचा संताप, भावनांचा उद्रेक!

हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, ज्वेलर्स असोशियन, स्कूल बस असोसिएशनचा बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी नागरिक करत आहेत. नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केले असून अनेक मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

Badlapur Protest News: 'साहेब, लाडकी बहिण नको, 'सुरक्षित बहीण' योजना पाहिजे..', बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक!
Maharashtra Politics: अजित पवार,मलिक, भुजबळ महायुतीत आले; भाजपची डोकेदुखी वाढली?

साहेब 'सुरक्षित बहीण योजना' पाहिजे....

राज्यात एकीकडे लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा जाहिरातबाजी सुरू आहे. महिलांना सक्षम बनवण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत, दुसरीकडे अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचाराच्या घटना घडूनही पोलीस प्रशासन कारवाईत टाळाटाळ करत आहे. याचाच निषेध म्हणून 'साहेब आम्हाला एकवेळ लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, पण सुरक्षित बहिण योजना पाहिजे', अशा आशयाचे बॅनर्स झळकावत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Badlapur Protest News: 'साहेब, लाडकी बहिण नको, 'सुरक्षित बहीण' योजना पाहिजे..', बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक!
Panjab Crime News: शिक्षक झाला हैवान! विद्यार्थ्यांला कार बोनेटवर लटकवून केलं भयंकर कृत्य; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com