Panjab Crime News: शिक्षक झाला हैवान! विद्यार्थ्यांला कार बोनेटवर लटकवून केलं भयंकर कृत्य; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Crime News: पजांब राज्यातील लोधीमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे
Panjab Crime News
Panjab Crime NewsSAAM DIGITAL
Published On

Panjab Crime News

पजांब राज्यातील लोधीमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. लोधीमधील एका तरुणाला कारच्या बोनेटवर लटकवून शिक्षकानं दहा किलोमीटरपर्यंत फिरवलंय. यात तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांत आरोपी शिक्षकाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानपूरमधील लोधीयेथील एका खासगी क्लासेसमधील शिक्षकाने हे क्रूर कृत्य केलंय. हरमनप्रीत सिंग याच क्लासमध्ये शिकत आहे. शालापूर बेट गावातील एका वळवणावर तरुण उभा होता. त्यावेळी एक कार भरधाव वेगात त्याच्या दिशेने आली. पुढे कारने त्याला जोरदार धडक दिली.

या कारमधून आरोपी शिक्षक बलजिंदर सिंग प्नवास करत होता. तरुणानं काही वेळानंतर आपला जीव वाचवण्यासाठी कारमधून उडी मारली. त्यामुळ तरुण गंभीर जखमी झाला.आरोपी शिक्षक हा पीडित तरुणाच्या गावचाच रहिवासी आहे.

जुन्या वैमनस्यातून घडवला अपघात

जखमी तरुणाला लगेचच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाच्या काकांनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बलजिंदर सिंग हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी आणि आमच्यात जुना वाद सुरू आहे. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या वादात पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती, असं तरुणाच्या काकांनी म्हटलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बलजिंदर सिंग यांच्याशी पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता. आरोपीच्या नातेवाईकांनी पीडित तरुणाच्या काकांनी केलेला आरोप खोटा असल्याचा दावा केलाय.

बलजिंदर सिंग हे काही दिवसांपासून आजारी होते . यामुळे घटनेच्या दिवशी ते आपल्या पत्नीसोबत येऊन त्यांच्या शाळेतून सुट्टीसाठी अर्ज करणार होते. परंतु त्याचवेळी हरमनप्रीत सिंग हा काही मित्रासोबत बलजिंदर हल्ला करण्यासाठी तिथं पोहचला. यानंतर बलजिंदर हल्ला केला आणि कारची काचही फोडली. या हल्ल्यात बलजिंदर सिंग जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे आरोपी बलजिंदर सिंग याने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी उपनिरीक्षक जसपाल सिंह यांनी सांगितले की, आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. काही संशयित लोकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यामातून अधिक तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com