Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात मे महिन्याचे ₹१५०० खटाखट जमा होण्यास सुरूवात

Majhi Ladki Bahin Yojana May Month Installment: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात मे महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला होता. आता महिलांची प्रतिक्षा संपलेली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्वतः ही माहिती दिली आहे. आजपासून महिलांच्या खात्यात मे महिन्याचा सन्मान निधी वितरीत केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर (Ladki Bahin Yojana)

मे महिना उलटून गेला तरीही खात्यात १५०० रुपये जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मे महिन्याचा हप्ता कधी येणार, जूनच्या हप्त्याचं काय असे प्रश्न विचारले जात होते. दरम्यान, आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे स्वतः आदिती तटकरेंनी सांगितले आहे.

महिलांच्या खात्यात पैसे आले की नाही असं करा चेक

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करु शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या बँकेच्या अॅपवर जाऊन अकाउंट बॅलेंस चेक करु शकतात. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊन पासबुकवर एन्ट्री करुन घेऊ शकतात. पासबुकवर तुम्हाला कधी किती पैसे तुमच्या खात्यात जमा झाले याबाबत सर्व माहिती मिळेल.

अडीच हजार महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु केली आहे. यातून तब्बल अडीच लाख सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिलांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, आता यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं स्पष्ट नमूद करण्यात आले होते. परंतु तरीही त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, आता अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु आहे. अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT