Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मिळाले का? जाणून घ्या चेक करण्याचे ४ सोपे मार्ग!

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana Saam tv
Published On

लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची अपडेट हाती आली आहे. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी 'एक्स'वर पोस्ट करून माहिती दिली आहे. मंत्री तटकरे यांच्या घोषणेनंतर अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ,काही पात्र महिलांना बँक खात्यात पैसै आले की नाही, हे कसे चेक करावे? याचा प्रश्न पडला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत केली. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट करत म्हटलं की, 'लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झालं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झालीये'.

'महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.

Ladki Bahin Yojana Update
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणाला नवं वळण; आत्महत्येचं रहस्य उलगडणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

खात्यात पैसे आले की नाही, कसे चेक करावे?

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात. तुम्हाला बँक खात्यात पैसे आले की नाही, हे तपासू शकता.

तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा. त्यानंतर तुम्ही कस्टमर केअरला बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.

तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपच्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करा. त्यानंतर तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही? हे तपासू शकता.

Ladki Bahin Yojana Update
Shocking : हृदयद्रावक! हवेत फेकलेलं बाळ जन्मदात्या बापाच्या हातातून निसटलं; डोक्यावर आपटून चिमुकल्याचा मृत्यू

तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील. तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल. १५०० रुपयांचा मेसेज आला आहे का? ते चेक करा

तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल. तर तुम्हाला स्वत: बँकेत जाऊनही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com