Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: फक्त याच महिलांना मिळणार जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता; खात्यात जमा होणार ₹३०००

Ladki Bahin Yojana January-February Installment Update: लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, फक्त काही महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट

फक्त या महिलांनाच मिळणार जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता

केवायसीमधील चुका दुरुस्त करणे अनिवार्य

फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे तरीही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात अद्याप जानेवारीचेच पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मागच्या वेळी डिसेंबरचा हप्तादेखील उशिरा आला होता. आता जानेवारीचा हप्तादेखील लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दलही चर्चा सुरु आहे.

जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana January-February Installment May Come Together)

जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला आहे.जिल्हा परिषद निवडणूकीआधी पैसे जमा होण्याची शक्यता होती. मात्र, हे पैसे काही जमा झालेले नाहीत. त्यामुळे है पैसे फेब्रुवारी महिन्यात येणार की लांबणीवर जाणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. याचसोबत हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, यामध्ये सर्व महिलांना पैसे मिळणार नाहीये. फक्त काही महिलांनाच पैसे दिले जाणार आहे.

फक्त या महिलांना मिळणार पैसे (Only These Women will get Ladki Bahin Yojana January Installment)

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. केवायसी पूर्ण करुन निकषात बसणाऱ्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत. त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे,घरात कार नसावी,या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच पैसे मिळणार आहेत.

अनेक महिलांनी केवायसीमध्ये काही चुका केल्या आहेत. या चुका सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. या चुका दुरुस्त झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर इतर महिलांचा लाभ सुरु होईल. यासाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. ३१ मार्चपर्यंत ज्या महिलांनी केवायसीमधील चुका दुरुस्त केल्या त्यांचा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या, किरकोळ वादातून मारहाण CCTV व्हायरल

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट, जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT