Badlapur : बदलापुरात लखनऊ पॅटर्न, भटक्या श्वानांसाठी उभारलं जाणार शेल्टर, नेमकं काय केलं जाणार?

Lucknow model stray dog shelter in Badlapur : बदलापूरमधील १५ हजारांहून अधिक भटक्या श्वानांच्या समस्येवर उपाय म्हणून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने 'संवेदना' प्रकल्प हाती घेतला आहे. लखनऊ पॅटर्नच्या धर्तीवर कात्रपमध्ये शेल्टर उभारण्यात येणार असून, श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण आणि उपचार केले जातील.
Stray Dogs
Stray Dogs Saam TV
Published On: 

मयुरेश कडव, बदलापूर प्रतिनिधी

Badlapur Samvedana project for stray dogs : बदलापूरकरांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुळगांव-बदलापूर नगरपालिकेनं पुढाकार घेतलाय. लखनऊ पॅटर्नच्या धर्तीवर बदलापुरात संवेदना हा नवा प्रकल्प राबवला जाणार असून, याअंतर्गत भटक्या श्वानांसाठी स्वतंत्र शेल्टर उभारलं जाणारंय. या शेल्टरच्या माध्यमातून शहरातील भटक्या श्वानांचं निर्बिजीकरण, लसीकरण केलं जाईल. तसच जखमी श्वानांवर उपचार केले जातील. सर्वात महत्वाचं म्हणजे भटक्या श्वानांना खाद्यपदार्थ देता यावेत आणि शहरात कचरा होऊ नये यासाठी लखनऊच्या धर्तीवर फिडिंग पॉईंटही तयार केले जाणार आहेत.

बदलापूर शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सध्या शहरात 15 हजारांहून अधिक भटके श्वान आहेत. वाढत्या संख्येसोबतच श्वानदंशाच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कुळगांव बदलापूर नगरपालिकेनं लखनऊ पॅटर्नच्या धर्तीवर संवेदना नावाचा विशेष उपक्रम हाती घेतलाय.

कात्रपमधील रिंग रोड लगत पालिकेच्या जागेवर भटक्या श्वानांसाठी भव्य शेल्टर उभारण्यात येणार आहे. या शेल्टरमध्ये भटक्या श्वानांचं शास्त्रीय पद्धतीनं निर्बिजीकरण आणि लसीकरण केलं जाईल. तसंच जखमी आणि आजारी श्वानांवर योग्य वैद्यकीय उपचारही केले जाणार आहेत. या प्रकल्पाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शहरात ठिकठिकाणी फिडिंग पॉईंट्स उभारले जाणार आहेत.

Stray Dogs
पडीक जमिनी सरकारी होणार का? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं उत्तर; म्हणाले, 'कुळ कायद्यांतर्गत...'

श्वानप्रेमी इथे-तिथे खाद्यपदार्थ न टाकता या निश्चित केलेल्या ठिकाणीच श्वानांना खायला घालू शकतील. यामुळे शहरातील अस्वच्छता कमी होण्यास मदत होईल. नगरपालिकेच्या या संवेदना प्रकल्पामुळे भटक्या श्वानांची आक्रमकता कमी होऊन त्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल, आणि श्वानांनाही मायेचा आधार मिळेल. या उपक्रमात बदलापुरातील 250 हून अधिक श्वानप्रेमी सहभागी होणार आहेत.

एकीकडे नागरिकांची सुरक्षितता आणि दुसरीकडे मुक्या प्राण्यांचं संरक्षण, या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न संवेदना प्रकल्पातून केला जाणार आहे. त्यामुळे बदलापूरमधील भटक्या श्वानांचा प्रश्न कितपत मार्गी लागतो, हे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच स्पष्ट होईल.

Stray Dogs
Rice Price : तांदळाच्या किमतींबाबत सरकारचा मास्टरस्ट्रोक! थेट २०% टॅक्स लागणार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.