Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ₹३०००; या दिवशी जमा होणार पैसे

Ladki Bahin Yojana February-March 3000 Rupees Installment Date: लाडकी बहीण योजनेत आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. १५ एप्रिलपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर

महिलांच्या खात्यात जमा होणार ₹३०००

या दिवशी पैसे जमा होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिनादेखील अर्धा संपला आहे तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, महिलांच्या खात्यात फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्रित येणार?

लाडकी बहीण योजनेत दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन आर्थिक वर्षात प्रत्यक्ष महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मार्च महिन्यात लाडक्या बहि‍णींच्या हप्त्यासाठी निधी पास केला जाऊ शकतो. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

लाडकी बहीण योजनेत १५ एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. या महिन्यात निधी मंजूर झाल्यानंतर हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाईल.पुढच्या महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे त्याआधी मागच्या वर्षीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात.

या महिलांना मिळणार ६००० रुपये (Ladki Bahin Yojana These Women Get 6000 Rupees)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, केवायसीमध्ये अनेक महिलांनी चुका केल्या आहेत. या चुका सुधारल्यानंतरच आता महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे. त्याआधी महिलांनी हे काम करायचे आहे अन्यथा त्यांना पैसे मिळणार नाहीत. केवायसी केल्यानंतर महिलांना रखडलेले सर्व हप्ते एकत्र दिले जाणार आहे. डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे डिसेंबर ते मार्च असे ४ हप्ते महिलांना दिले जाणार आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ६००० रुपये जमा केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT